आजचे पंचांग 25 डिसेंबर 2024: लाभ योग, अतिगंड योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 25 December 2024 in Marathi: बुधवार, २५ डिसेंबर २०२४, भारतीय सौर ४ पौष शके १९४६, मार्गशीर्ष कृष्ण दशमी रात्री १०-२८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: चित्रा दुपारी ३-२० पर्यंत, चंद्रराशी: तूळ, सूर्यनक्षत्र: मूळ

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष १०, शक संवत १९४६, मार्गशीर्ष, कृष्ण, दशमी, बुधवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे १२, जमादी उल्सानी २२, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २५ डिसेंबर २०२४. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, दशमी तिथी रात्री साडे दहा पर्यंत त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ
चित्रा नक्षत्र दुपारी ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ, अतिगंड योग रात्री ९ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ, वणिज करण सकाळी ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र तुळ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१०
  • सूर्यास्त: सायं. ६-०७
  • चंद्रोदय: उत्तररात्री २-५६
  • चंद्रास्त: दुपारी १-५०

  • पूर्ण भरती: सकाळी ६-२८ पाण्याची उंची ३.३८ मीटर. रात्री: ९-०५ पाण्याची उंची ३.३९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी १-४३ पाण्याची उंची १.५४ मीटर, उत्तररात्री २-२८ पाण्याची उंची २.६१ मीटर
  • सण आणि व्रत : ख्रिसमस, नाताळ, लाभ योग, अतिगंड योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २५ मिनिटांपासून ते ६ वाजून १९ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १२ मिनिटांपासून ते २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजल्यापासून ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३८ मिनिटांपासून ते ६ वाजून ५ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ११ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून २९ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ९ वाजून १२ मिनिटांपासून ते १० वाजून २९ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
गणपतीला दुर्वा अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

25 december daily panchang25 डिसेंबर दिनविशेष25 डिसेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगलाभ योग
Comments (0)
Add Comment