Today Horoscope 25 december in Marathi, आजचे राशीभविष्य:
आज बुधवार २५ डिसेंबर नाताळाचा सण आहे. तुळ राशीत चंद्र असणार आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी असून अतिगंड योग, वणिज करण आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा आहे.
आज बुधवार २५ डिसेंबर नाताळाचा सण आहे. तुळ राशीत चंद्र असणार आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी असून अतिगंड योग, वणिज करण आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे. मुलांना परीक्षेत यश मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहिल. तुमचा आदर वाढेल. व्यवसायातील कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. मित्रांसोबत वेळ घालवाल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. पालकांच्या मदतीने केलेल्या कामाचे शुभ परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. कुटुंबासोबत शुभ कार्यात सहभागी व्हाल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – मन प्रसन्न राहिल
आज तुम्हाला कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. आज पूर्ण सहाकर्य मिळेल. मुलांना परीक्षेत यश मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहिल. तुमचा आदर वाढेल. व्यवसायातील कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. मित्रांसोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करा.
वृषभ – कामात यश
आज व्यवसायात यश मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न होईल. नोकरीसाठी काम करणाऱ्यांच्या प्रयत्नाना यश मिळेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. पालकांच्या मदतीने केलेल्या कामाचे शुभ परिणाम मिळतील.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा
मिथुन- मोठे नुकसान होईल
आज तुम्हाला व्यवसायात कोणातही करार अंतिम करावा लागेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. भविष्यात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. कुटुंबासोबत शुभ कार्यात सहभागी व्हाल.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्न वस्त्र दान करा
कर्क – व्यस्त असाल
आज तुम्ही मालमत्ता खरेदी करण्यात व्यस्त असाल. नोकरी करणाऱ्यांना कामात नवीन संधी मिळतील. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. त्यांची प्रगती पाहून आनंदी व्हाल. तुम्हाला प्रवास करावा लागेल, ज्यातून फायदा होईल. तुम्ही प्रिय व्यक्तीला भेटाल.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाला खडीसाखर आणि लोणी अर्पण करा.
सिंह – आर्थिक स्थिती मजबूत
आज तुम्हाला व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. बोलण्यात सौम्यता ठेवावी लागेल. तुमचा आदर वाढेल. स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असाल तर त्यात यश मिळेल. भावाच्या मदतीने रखडलेले काम पूर्ण होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात पार्टनरशीपमधून नफा मिळेल.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा.
कन्या – आळस दूर करा
आज तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रयत्न केल्यावर यश मिळेल. तुमचा आळस दूर करुन कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायात प्रगती करु शकाल. कायदेशीर प्रकरणात तुम्हाला विजय मिळेल. कुटुंबात भावंडांशी वाद असतील तर ते संपतील. लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा राहिल.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा
तुळ – समस्यांवर उपाय सापडेल
आज तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहिल. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाच्या प्रस्तावास मान्यता मिळेल. कुटुंबात आनंद वाढेल. व्यवसायातील समस्यांवर उपाय सापडेल. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. पुरेसे पैसे मिळाल्याने आनंद होईल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण कराल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा
वृश्चिक – कलह वाढेल
आजचा दिवस गोंधळाचा असेल. कुटुंबातील कलह पुन्हा डोकेवर काढेल. ज्येष्ठ सदस्यांच्या मदतीने काम पूर्ण होईल. मुलाला सामाजिक कार्य करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. परदेशात राहणाऱ्या सदस्यांना चांगली बातमी मिळेल.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्न खाऊ घाला.
धनु – व्यवसायात निर्णय घ्याल
आज तुम्ही कोणतेही काम करत असाल तर नशिबाची पूर्ण साथ मिळेल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करण्याचा निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला असेल. व्यावसायिकांना जोखीम घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात काही समस्या भेडसावू शकतात.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा.
मकर – इच्छुकांचे लग्न जमेल
तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काम करावे लागेल. तुम्हाला कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. इच्छुकांचे लग्न जमेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मुलांच्या काही गोष्टींमुळे निराश व्हाल. जोडीदारासोबत काही वाद सुरु असेल तर संपेल.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करा.
कुंभ – आर्थिक खर्च वाढेल
आज तुम्ही कोणालाही पैसे उधार देणे टाळा, पैसे अडकू शकतात. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होतील. आज तुमच्या नोकरीत काही नवीन विरोधक निर्माण होतील. सहकाऱ्यांसोबत जे काम कराल त्यात यश मिळेल. वाहन बिघाडामुळे आर्थिक खर्च वाढेल.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्याला जल अर्पण करा.
मीन – पश्चाताप होईल.
आज तुम्ही खूप व्यस्त असाल. कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकाल. कौटुंबिक जीवनात काही अडथळे येतील. धार्मिक क्षेत्रात प्रवास अनुकूल राहिल. सासरच्या लोकांशी व्यवहार करणे टाळा. पश्चाताप करावा लागेल.
आज भाग्य ९४ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा.