Pushpa 2 Box Office: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांना मागे टाकत हिंदीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम केला आहे.
हायलाइट्स:
- ‘पुष्पा २’ ने २०व्या दिवशी खळबळ उडवून दिली
- अल्लू अर्जुनचा हा चित्रपट हिंदीत ७०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे.
- दोन सिनेमांमुळे अडतय बाहुबलीचं गणित
‘पुष्पा २’ ने १०८९.८५ कोटींची कमाई केली आहे
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या मंगळवारीही या चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी या चित्रपटाने १४.२५ कोटींची बंपर कमाई केली आहे. पुष्पा २ ने केवळ हिंदीत ११.५ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत सिनेमाने एकूण १०८९.८५ कोटींची कमाई केली आहे. एकट्या हिंदीत चित्रपटाची कमाई ७०१.६५ कोटींवर पोहोचली आहे.
जगभरात १५५० कोटींचे केलक्शन
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जवळपास १५५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने परदेशात १९ दिवसांत १५२६.९५ कोटींची कमाई केली. तेथील एकूण कमाई २५० कोटींच्या पुढे गेली आहे. जगभरातील कमाईच्या बाबतीत हा चित्रपट अजूनही या दोन चित्रपटांच्या तुलनेत मागे आहे.
‘पुष्पा २’ या दोन चित्रपटांच्या मागे आहे
‘बाहुबली २’ ने १७८८.०६ कोटी रुपयांच्या कलेक्शनचा रेकॉर्ड केला होता, जो ‘पुष्पा २’ सहज गाठू शकतो. तर ‘दंगल’ने जगभरात सर्वाधिक म्हणजेच २०७०.३ कोटी रुपयांची कमाई करण्याचा विक्रम केला होता. मात्र, अल्लू अर्जुनला आमिर खानच्या चित्रपटाचा विक्रम मोडणे कठीण होणार असे वाटते.
पुष्पा २ ने हिंदीत मोडले सारे रेकॉर्ड, ७०० कोटींची कमाई! या दोन सिनेमांनी आणलेत नाकीनऊ
अल्लू अर्जुनने ३०० कोटी रुपयांची तगडी फी घेतली
रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी ३०० कोटी रुपये इतकी मोठी रक्कम घेतली आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी जवळपास ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत.