Pushpa 2 Vs Baby John Box Office Collection: ‘पुष्पा २’ या सिनेमाची २१व्या दिवशीही दणक्यात कमाई झाली, तर ‘बेबी जॉन’साठी कसा होता पहिला दिवस?
हायलाइट्स:
- ‘बेबी जॉन’ची किती झाली कमाई?
- ‘पुष्पा २’ने गाजवला ख्रिसमसचा दिवस
- वरुण धवनचा धमाकेदार सिनेमा
‘बेबी जॉन’ची किती झाली कमाई?
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘बेबी जॉन’ने पहिल्या दिवशी देशभरात १२.५० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. रिलीजपूर्वी, आगाऊ बुकिंगमधून सिनेमाने ३.५२ कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर स्पॉट बुकिंगमधून मिळणाऱ्या कमाईतही वाढ झाली. ही कमाई वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आगाऊ बुकिंगसाठी ‘बेबी जॉन’ला तीन दिवसांचा अवधी मिळाला होता.
एक मास मूव्ही, ॲक्शन फिल्म आणि हॉलिडे रिलीज असल्याने ‘बेबी जॉन’ने पहिल्या दिवशी आणखी जास्त कमाई केली असती, पण असे झाले नाही. याचे कारण म्हणजे सकाळच्या आणि दिवसभराच्या शोजनंतर सायंकाळच्या आणि रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांच्या संख्येत फारशी वाढ झाली नाही. ‘बेबी जॉन’चे बजेट १८५ कोटी रुपये आहे, सध्या ज्या बजेटचे चित्रपट बनतात त्या दृष्टीने हे फार नाही. त्यामुळे या चित्रपटाला अजूनही संधी आहे. रीलिजनंतर पहिलाच वीकेंड पाच दिवसांचा मिळाला आहे, त्यामुळे या कमाईत वाढ होऊ शकते. या वर्षातील आणखी एक हिट चित्रपट होण्याकडे ‘बेबी जॉन’ वाटचाल करू शकतो.
पुष्पा २ला अजूनही प्रेक्षकांची पसंती
२५ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २ – द रुल’ पुन्हा हिंदी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची पहिली पसंती राहिला. रिलीजच्या २१व्या दिवशी सिनेमाच्या हिंदी आवृत्तीमधून १५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. तर पाचही भाषांचा समावेश केला असता, या सिनेमाने बुधवारी १९.७५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पुढचे काही दिवस या कमाईत घट होईल असे चिन्ह नाही. आतापर्यंत या सिनेमाने हिंदीमध्ये ११०९.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी व्हर्जनने आतापर्यंत ७१६.६५ कोटी, तर तेलुगू आवृत्तीने ३१६.३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.