January 2025 Grah Sankarman : जानेवारी महिन्यात सूर्य आणि बुध यासारख्या शुभ ग्रहांच्या राशी परिवर्तनासह नवीन वर्षाची शानदार सुरुवात होणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बुध धनु राशीत प्रवेश करेल तर सूर्य ग्रह मकर राशीत संक्रमण करेल. यानंतर देशभरात मकर संक्रांतीचे महापर्व साजरे होणार आहे. त्यानंतर मंगळ ग्रह मिथुन राशीत संक्रमण करणार असून बुध पुन्हा एकदा मकर राशीत येईल. शेवटी शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन होऊन तो मीन राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे तयार होणारा राजयोग मेष आणि तुळसह 5 राशींसाठी शुभफलदायक आहे. या राशींसाठी वर्षाची सुरुवात अत्यंत उत्तम ठरणार आहे.
मेष राशीवर ग्रह संक्रमणचा प्रभाव : आर्थिक लाभ, व्यवसायात वाढ
मेष राशीच्या जातकांसाठी जानेवारी 2025 मध्ये होणारे ग्रह संक्रमण आर्थिक लाभ घेऊन येणार आहे. या काळात सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल तसेच नवीन संपर्क होतील. व्यावसायिक कारणामुळे तुम्हाला या काळात प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्या करिअरसाठी फायदेशीर आहे. जे लोक व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी हे ग्रह संक्रमण फायदेशीर असून काम पुढे वाढवण्यासाठी संधी मिळेल.
वृषभ राशीवर ग्रह संक्रमणचा प्रभाव : प्रगतीच्या अनेक संधी, सुख-समृद्धीचे योग
वृषभ राशीच्या लोकांना जानेवारी महिन्यात प्रगतीच्या अनेक संधी मिळतील तसेच तुमच्यासाठी उन्नतीचे नवे मार्ग खुले होतील. वृषभ राशीचे जे लोक व्यवसाय करतात त्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही एकत्र काम करून कामाला पुढे नेण्याची योजना तयार करू शकता. तुमच्यासाठी नवीन वर्ष आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ असणार आहे. तसेच जीवनात सुख -समृद्धीचे अनेक योग येतील.
कन्या राशीवर ग्रह संक्रमणचा प्रभाव : करिअरमध्ये प्रगती, लवलाइफ उत्तम
कन्या राशीसाठी हे ग्रह संक्रमण करिअरच्या बाबतीत चांगले परिणाम देणार आहे. व्यवसायिकांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी संधी उत्तम आहे. तुम्हा अधिक आर्थिक लाभ मिळेल. लवलाइफ चांगले असून नातेसंबंध वृद्धींगत होतील. तब्येत चांगली राहणार आहे. कुंभ राशीचे जे जातक नोकरी शोधत आहेत त्यांना उत्तम संधी मिळेल.
तुळ राशीवर ग्रह संक्रमणचा प्रभाव : जीवनात यश, व्यवसायात दुप्पट नफा
तुळ राशीच्या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे. व्यापारी वर्गाला उत्तम परिणाम दिसून येतील. ग्रह संक्रमणामुळे जीवनात भरपूर यश मिळेल. या काळात तब्येत उत्तम असेल. पुढे जाण्यासाठी नवे मार्ग सापडतील. व्यापारात प्रगती तसेच प्रेम जीवन चांगले असेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासोबत अधिक वेळ व्यतीत करणारा आहात.
मकर राशीवर ग्रह संक्रमणचा प्रभाव : करिअरमध्ये प्रगती, गुंतवणुक लाभदायक
मकर राशीच्या लोकांसाठी ग्रहांचे संक्रमण अत्यंत शुभ असून करिअरच्या दृष्टीने फलदायी ठरणार आहे. करिअरमध्ये भरपूर प्रगती होणार आहे. कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, त्याचा नक्की फायदा होईल. व्यवसायात उत्तम यश आहे तसेच कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर नक्की करा, भरपूर फायदा मिळणार आहे.