Tulsi leaves Cutting Rules: तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. घर लहान असो वा मोठं तुळशीची कुंडी घरात असतेच. तुळशीवृदांवन असो वा कुंडीत लावलेले तुळशीचे रोप त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच तुळशीची पाने तोडण्याचे काही नियम देखील आहेत त्यानुसार तुळशीची पाने तोडायला हवीत. आता ते नियम कोणते, जाणून घेऊया.
Instructions For Plucking Tulsi Leaves:
भगवान विष्णु यांना तुळस अती प्रिय आहे. भगवान विष्णुवर तुळस अर्पण करून त्यांची कृपादृष्टी प्राप्ती केली जाते. तुळस घरात असेल तर त्यासंदर्भात ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगितलेले आहेत. त्या नियमांचे पालन केले तर तुळशीमुळे सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहते. घरातील अडचणी कमी होतात. ते नियम पुढील प्रमाणे आहेत.
- तुळशीला रविवार, मंगळवार आणि एकादशी दिवशी पाणी देऊ नये, कारण या दिवशी तुळशी मातेच व्रत केले जाते. तसेच ज्या दिवशी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असेल त्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत.
- जे लोक एकादशीचे व्रत करतात, त्यांना एकादशी आणि द्वादशी तिथीला तुळशीची पाने तोडू नयेत.
- तुळशी समोर नियमीतपणे दिवा लावा तसेच जिथे तुळशी वृदांवन किंवा तुळशीचे रोप आहे, ती जागा स्वच्छता करा. समजा तुळशीच्या आसपास घाण किंवा कचरा राहीला तर कुटुंबावर संकट येते किंवा प्रत्येक कामात अडचणींचा सामना करावा लागतो.
- तुळशीच्या मंजिरी भगवान विष्णू यांना अर्पण कराव्यात. असे सांगितले जाते की तुळशीवर खूप मंजिरी आल्या तर तुळस दुःखी आहे असे समजावे. म्हणून तुळशीच्या मंजिरी तोडून भगवान विष्णूंना अर्पित कराव्यात, यामुळे नारायणाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर कायम राहते.
- तुळशीचे पान सूर्यास्तानंतर तोडू नयेत. जर खूपच आवश्यक असेल, तर टाळी वाजवून आणि तुळशी मातेची प्रार्थना करूनच तुळशीची पान तोडावीत.
- तुळशीच्या आसपास शमी वगळता अन्य कोणतेही काटेरी झाड लावू नये, समजा एखादे रोप उगवले तर त्याला काढून इतर ठिकाणी त्याचे रोपण करावे. तुळशीच्या कुंडीत इतर कोणतेही रोप लावू नका.
- गणपती, शिवशंकर आणि दुर्गा मात यांना तुळस अर्पण करू नये. ज्या घरात तुळशीचे रोप आहे तेथील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यायला हवे.
- रात्री तुळशीला हात लावू नये आणि विनाकारण तुळशीची पाने तोडू नयेत.