Brass Tortoise Vastu Rules: वास्तुशास्त्रानुसार, काही वस्तू घरात ठेवल्या तर सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. अनेकजण घरात पितळेचे कासव ठेवतात त्यामुळे घरात धनलाभ कायम रहावा आणि नकारात्मकता दूर होवून सुख समृद्धी नांदावी. वास्तुशास्त्रानुसार कासव योग्य दिशेला ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा अनर्थ होवू शकतो. तुमच्या घरात पितळी कासव असेल तर त्याबद्दलची माहिती देणारा हा लेख आवर्जून वाचा.
पितळी कासव कोणत्या दिशेला ठेवावे?
वास्तुशास्त्रातील एक प्रमुख नियम म्हणजे सकारात्मक ऊर्जा मिळवायची असेल तर वस्तूची दिशा योग्य हवी. घरात पीतळी कासव ठेवणे शुभ आहे. पीतळी कासवामुळे घराला संरक्षण मिळते तसेच सुखसमृद्धी कायम राहते. पीतळ, सोने किंवा चांदीचे कासव सदैव उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेत ठेवायला हवे. समजा तुमच्याकडे क्रिस्टलचे कासव असेल तर ईशान्य कोनात ठेवणे शुभ मानले जाते.
पितळचे कासव घरात ठेवण्याचे विशेष नियम
कासव पितळेचे असेल तरी त्याला नेहमी पाण्यात ठेवा, त्यामुळे त्याच्या पायांना ओलावा मिळतो. पाणी रोज बदलणे आवश्यक आहे. यामुळे स्वच्छता कायम राहते आणि रोगांपासून बचाव होतो.
कासव अशा ठिकाणी ठेवा, जिथे तुम्ही जास्त वेळ व्यतीत करता.
कासव मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवू शकता, मात्र लक्षात ठेवा त्याचे तोंड घराच्या आत असावे. जर घरात देवघर असेल तर कासवाचे तोंड देवघराच्या दिशेने ठेवा. यामुळे कासवाला योग्य वातावरण मिळते.
घरात पितळी कासव का ठेवावे?
वास्तुशास्त्रानुसार, घरात पीतळेचे कासव ठेवले तर शुभ फल मिळते. आनंद, उत्साह कायम राहून सकारात्मक ऊर्जा कायम रहाते. नकारात्मक ऊर्जा दूर होवून नशिबाची साथ मिळते. पितळी कासवाला घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवले तर घराचे वातावरणात सुख, समृद्धी कायम रहाते.