मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाचा कार्यभार स्वीकारला – महासंवाद




मुंबई, दि. 27 :पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात आगमन झाले. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने अत्यंत साधेपणाने मंत्री श्रीमती मुंडे यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात पदभार स्वीकारून कामकाजाची सुरुवात केली.

यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी मंत्री कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००







Source link

Comments (0)
Add Comment