Today Horoscope 28 december in Marathi, आजचे राशीभविष्य:
आज शनिवार २८ डिसेंबर चंद्र मंगळ राशीत वृश्चिक राशीत आहे आणि मंगळ कर्क राशीत आहे, त्यामुळे राशी परिवर्तन योग तयार होत आहेत. तसेच, आज मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. या तिथीला शनि प्रदोष व्रत पाळले जाईल आणि हे वर्षातील शेवटचे शनि प्रदोष व्रत असणार आहे. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी राशी परिवर्तन योगासह शशयोग आणि अनुराधा नक्षत्राचा शुभ संयोग असल्याने आजचे महत्त्व अधिकच वाढले आहे. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी शनिवारचा दिवस कसा आहे.
आज शनिवार २८ डिसेंबर चंद्र मंगळ राशीत वृश्चिक राशीत आहे आणि मंगळ कर्क राशीत आहे, त्यामुळे राशी परिवर्तन योग तयार होत आहेत. तसेच, आज मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. या तिथीला शनि प्रदोष व्रत पाळले जाईल आणि हे वर्षातील शेवटचे शनि प्रदोष व्रत असणार आहे. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी राशी परिवर्तन योगासह शशयोग आणि अनुराधा नक्षत्राचा शुभ संयोग असल्याने आजचे महत्त्व अधिकच वाढले आहे. कुटुंबातील सदस्याच्या लग्नाचा निर्णय घ्याल. मुलांकडून काही निराशाजनक बातम्या ऐकू येतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. मुलांकडून काही आवडत्या बातम्या ऐकायला मिळतील. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना नवीन पद मिळेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – सावध राहा
आजच्या दिवशी तुम्हाला सावध राहावे लागणार आहे. जोडीदाराकडून तुम्हाला पुरेसे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्याच्या लग्नाचा निर्णय घ्याल. मुलांकडून काही निराशाजनक बातम्या ऐकू येतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.
वृषभ – नवीन पद मिळेल
आज पैशांचे व्यवहार करत असाल तर त्यात यश मिळेल. तुम्हाला प्रत्येक बाबतीत समाधान आणि शांती मिळेल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. मुलांकडून काही आवडत्या बातम्या ऐकायला मिळतील. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना नवीन पद मिळेल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची पूजा करा.
मिथुन – वाद होतील
आज मुलांसाठी ठोस निर्णय घ्यावे लागतील. तुमची मौल्यवान वस्तू हरवू शकते. त्यासाठी तुम्हाला सावध राहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळाल्याने आनंद होईल. वडिलांशी वाद होतील.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणाचा पाठ वाचा.
कर्क – आर्थिक स्थिती मजबूत
आज नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या सन्मानात वाढ होणार आहे. संथ गतीने तुमचा व्यवसाय सुरु राहिल. कोणताही निर्णय बुद्धी आणि विवेकाने घ्याल. तुम्हाला यश मिळेल.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पण करा.
सिंह – डोळ्यांचे विकार वाढतील
आज तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. तुम्हाला त्यातून लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात काही समस्या येत असतील तर त्यावर उपाय शोधाल. बोलण्यातल्या सौम्यतेमुळे ऑफिसमध्ये सन्मान होईल. डोळ्यांचे विकार वाढतील.
आज भाग्य ९४ टक्के तुमच्या बाजूने राहिल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.
कन्या – जोडीदाराचा पाठिंबा मिळेल
आज तुम्ही व्यस्त असाल. तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार आहे. तुमच्या प्रगतीत शत्रू अडथळे निर्माण करतील. मुलांचे लग्न निश्चित होऊ शकते. सासरच्या लोकांशी वाद होतील. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. तुम्हाला कोणाकडून कर्ज सहज मिळेल.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा.
तुळ – अडथळे दूर होतील
आज भावाच्या लग्नातील अडथळे दूर होतील. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदात वाढ होईल. कुटुंबात शुभ कार्यक्रम होतील. व्यवसायात पैशांची समस्या होती ती संपणार आहे. परदेशात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी मिळेल.
आज भाग्य ६१ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा.
वृश्चिक – आरोग्याची काळजी घ्या
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा निराशाजनक असेल. तुमच्या भावना कोणाकडेही व्यक्त करु नका. व्यवसायातील नवीन कल्पना सहकाऱ्यांना सांगू नका. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना थोडे निराश वाटेल. तब्येत बिघडू शकते.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला चपाती खाऊ घाला.
धनु – आर्थिक लाभ मिळेल
आज नोकरी आणि व्यवसायात तुमचे शत्रू तुमची प्रशंसा करतील. तुम्हाला सरकार आणि सत्तेचा लाभ मिळेल. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळेल. सरकारी कामे पूर्ण होतील.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्याला जल अर्पण करा.
मकर – नात्यात दूरावा
आज उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला राहिल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. नात्यात दूरावा येऊ शकतो.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा.
कुंभ – तणावमुक्त व्हाल
आज तुम्ही तणावमुक्त असाल. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून प्रतिकूल बातम्या ऐकू येतील. तुम्हाला अनपेक्षित प्रवास करावा लागेल, त्यामुळे काळजी घ्या. तुम्हाला परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळावी लागेल.
आज भाग्य ७४ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीगणेश चालीसाचे पठण करा.
मीन – पैसे अडकतील
आज तुम्हाला भविष्याची चिंता सतावेल. भविष्यातील काही योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला जोडीदाराच्या पाठिंब्याची आवश्यकता जाणवेल. पैशांची देवाणघेवाण करत असाल तर अजिबात करु नका, अन्यथा पैसे अडकतील. मौल्यवान वस्तू हरवू शकते.
आज भाग्य ८५ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा.