Pushpa 2 ने पहिल्यांदाच केली सर्वात कमी कमाई; तरीही बॉक्स ऑफिसवर रचना अनोखा रेकॉर्ड

Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा २’ने चौथ्या शुक्रवारी म्हणजेच २७ डिसेंबर २०२४ रोजी किती कोटींची कमाई केली?

हायलाइट्स:

  • अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाचा सिनेमा
  • ‘पुष्पा २’ने किती केली कमाई?
  • चौथ्या शुक्रवारी घटले बॉक्स ऑफिस कलेक्शन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पुष्पा २: द रुल’ या सिनेमाने चौथ्या शुक्रवारी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली. असे असले तरीही सिनेमाची ही कमाई कोट्यवधीच्या घरातच आहे, २३व्या दिवशी ‘पुष्पा २’ने ८.७५ कोटी कमावले आहेत. ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. मात्र या आठवड्यात सिनेमाच्या कमाईत लक्षणीय घट झाली.

२३व्या दिवशी किती झाली कमाई?

तिकीट विक्रीतही ‘पुष्पा २’ सिनेमाने १६% घट अनुभवली. २७ डिसेंबर रोजी या सिनेमाच्या तेलगू भाषेतील आवृत्तीने १.९१ कोटी रुपये आणि हिंदीमध्ये ६.५ कोटींची कमाई केली. तर तामिळ भाषेत ३० लाख रुपये, कन्नडमध्ये ३० लाख आणि मल्याळममध्ये १० लाख रुपयांची कमाई झाली आहे.

हिंदीमध्ये सर्वाधिक कमाई

Sacnilk ने दिलेल्या रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या आकडेवारीचा अंदाज असा आहे की, या चित्रपटाने ११२८ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हिंदी बॉक्स ऑफिसवर ७५० कोटींच्या कमाईकडे सिनेमाची वाटचाल सुरू आहे, सध्या हा आकडा ७३१.१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मूळ तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या हिंदी आवृत्तीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आघाडीवर आहे, तर तेलुगू आवृत्तीने आतापर्यंत ३२०.१३ कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच तेलुगू भाषेतील या सिनेमाची कमाई हिंदीपेक्षा निम्मी आहे. सिनेमाच्या इतर व्हर्जननी एकत्रितपणे ७७.४८ कोटी रुपयांची कमाई केलीये.

कित्ती गोड! राहा कपूर ठरतेय पापाराझींची आवडती स्टारकिड; लेकीच्या कृतीमुळे आलियालाही आवरेना हसू
‘पुष्पा 2: द रुल’ची कमाई आठवड्यानुसार पाहिल्यास, पहिल्या आठवड्यात ७२५.८ कोटी रुपयांची कमाई झाली. तर दुसऱ्या आठवड्यात ही कमाई २६४.८ कोटी रुपयांपर्यंत घटली. यानंतर या कमाईत आणखी घट होऊन तिसऱ्या आठवड्यात १२९.५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

आणखी एक रेकॉर्ड

पहिल्या आठवड्याच्या तुलनेत कमाई घटली असली तरीही, मिळालेल्या माहितीनुसार बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या आठवड्यात १०० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन करणाारा ‘पुष्पा २’ हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. ‘पुष्पा २’ आता २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

allu arjun rashmika mandanna pushpa 2pushpa 2 box office collectionPushpa 2 Box Office Collection Day 23Pushpa 2 Lowest Box Office Collectionअल्लू अर्जुनपुष्पा 2पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डपुष्पा 2 बॉक्स ऑफिस कलेक्शनरश्मिका मंदानासुकुमार दिग्दर्शित पुष्पा
Comments (0)
Add Comment