चांगले काम करणाऱ्या वसतिगृहाचा आदर्श घ्यावा- मंत्री संजय शिरसाट – महासंवाद




पुणे, दि.२८: सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोशी, पिंपरी चिंचवड येथील 250 क्षमतेच्या मुलींचे शासकीय वसतिगृहाची भेट देऊन पाहणी केली. या वसतिगृहाचे काम समाधानकारक असल्याचे सांगून चांगले काम करणाऱ्या वसतिगृहांचा राज्यातील इतर वसतिगृहांनी आदर्श घ्यावा, असेही ते म्हणाले.

यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, सहआयुक्त प्रमोद जाधव, पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, पुणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, गृहप्रमुख मीनाक्षी येमले, गृहपाल प्रमिला आमले आदींसह कर्मचारी व वसतीगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

आपल्यासमोर विद्यार्थ्यांच्या हिताला कायम प्राधान्य असल्याचे सांगून त्या दृष्टीकोनातूच राज्यातील विविध शासकीय वसतिगृहांची पाहणी करत असल्याचे मंत्री श्री. शिरसाट यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थिनींशी चर्चा करत वसतिगृहातील जेवण तसेच देण्यात येणारे शालेय साहित्य, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था आदी सुविधांबाबत त्यांनी मुलींकडून माहिती जाणून घेतली. वसतिगृहात असलेली स्वच्छता व इतर कामकाजाबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी समाजकल्याण विभागाचे अधिकारी तसेच वसतिगृहाच्या गृहप्रमुख, गृहपालांनी मंत्री श्री. शिरसाट यांना वसतिगृहाच्या कामकाजाची माहिती दिली.

०००







Source link

Comments (0)
Add Comment