Aquarius Horoscope 2025 In marathi : ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष 2025 कुंभ राशीच्या जातकांसाठी हे वर्ष चला तर करिअर, धनसंपत्ती, आरोग्य, लवलाइफ, कुटुंब याबाबतीत कुंभ राशीच्या लोकांसाठी 2025 वर्षाचे वार्षिक राशीभविष्य कसे आहे ते पाहूया.
Kumbha Rashifal 2025 In Marathi :
कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्ष 2025 हे गतवर्षीच्या तुलनेत चांगले आहे, पण आव्हानांचा सामना करावा लागेल. तुम्ही अजूनही साडेसातीच्या प्रभावाखाली असणार आहात. मात्र, मार्च अखेरीस शनिचे राशी परिवर्तन होईल आणि त्यामुळे तुमच्या साडेसातीच्या टप्प्यांमध्ये बदल होईल. या वर्षात तुमची मध्य साडेसाती संपेल आणि अंतिम साडेसाती सुरू होईल. या काळात तुम्हाला आधी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. तरीपण संघर्ष आणि परिश्रमाचा काळ सुरुच राहणार आहे. या वर्षातील राहूचे संक्रमण तुमच्या राशीत मे महिन्याच्या अखेरीस होईल, ज्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. निर्णय गंभीरतेने घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. पण तुमच्यासाठी एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे, 14 मे पासून गुरुचे संक्रमण 18 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या राशीच्या पाचव्या स्थानात होईल. त्यामुळे ग्रहांचा शुभ परिणाम दिसून येईल. लवलाइफ उत्तम आहे, मुलांकडून चांगली बातमी मिळेल. चला, जाणून घेऊया 2025 मध्ये कुंभ राशीला करियर, आरोग्य, आर्थिक आणि लवलाइफसाठी कसे असणार आहे, तसेच शुभलाभासाठी कोणते उपाय करायला हवेत.
कुंभ राशी 2025 आरोग्य
कुंभ राशीच्या जातकांना वर्ष 2025 मध्ये आरोग्याच्या बाबतीत लक्ष द्यावे लागेल. मे महिन्यात राहूचे संक्रमण होणार आहे त्यामुळे पोटासंबंधीत समस्या डोके वर काढतील. तुमचे आजारपण नेमके काय आहे ते समजणार नाही त्यामुळे एकापेक्षा जास्त डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागू शकतो. संतती सुखाचे योग या वर्षी आहे. आहार आणि जीवनशैली संतुलित ठेवा, तसेच योग, ध्यान आणि व्यायाम करा.
कुंभ राशी 2025 करिअर
कुंभ राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगले आहे. गेल्या वर्षी जेवढ्या समस्या होत्या त्यातून मोकळीक मिळेल. तुम्ही आधी जी काही मेहनत केली होती त्याचे फळ मिळेल. वरिष्ठांसोबत चांगले संबंध ठेवा तुम्हाला लाभ होईल, मे नंतर तुम्हाला कार्यक्षेत्रात पदोन्नती आणि आर्थिक लाभाचा योग आहे. या वर्षी, नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचे सर्व पैलू समजून घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. या वर्षी तुम्ही जी काही कामे करणार आहात ती संयमाने आणि विचारपूर्वकपणे करा. जोखीम घेण्यापासून शक्यतो दूर राहा. कुंभ राशीचे जे लोक इलेक्ट्रिकल उपकरणे आणि तंत्रज्ञानाशी संबंधीत आहेत, त्यांच्या कामात गती असून वर्षाच्या उत्तरार्धात उत्तम यश मिळेल.
कुंभ राशी 2025 आर्थिक भविष्य
कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत 2025 हे वर्ष आर्थिक बाबतीत ठिक आहे पण फार जोखीम घेऊ नका. शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सखोल माहिती घ्या आणि पुढे जा, अन्यथा पैसे अडकू शकतात. वडिलोपार्जीत संपत्तीमध्ये ताणतणाव जाणवेल. कार्यक्षेत्रातील मिळकत वाढेल पण खर्च दुप्पट होतील. घरातील इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये सारखा बिघाड होईल त्यामुळे पैसे जास्त खर्च होतील. तब्येत बिघडण्याची शक्यता असून जास्त खर्च होणार आहे. बचत करण्याचा प्रयत्न करा. खर्च वाढत गेले तर कर्ज घ्यावे लागेल.
कुंभ राशी 2025 प्रेम आणि कुटुंबातील संबंध
या वर्षी कुंभ राशीच्या जातकांसाठी प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत पहिले तीन महिने त्रास आहे. जवळच्या नातेवाईंकामामुळे ताणतणावाचा सामना करावा लागेल. मे महिन्याच्या मध्यवर्ती कालावधीपासून स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानी असेल. वैवाहिक जीवन ठिक असून जोडीदाराची साथ मिळेल. नाराजी दूर होऊन संबंध सुधारतील. संतती सुखाचा योग आहे. प्रेमसंबंधात सकारात्मकता दिसून येईल. तसेच प्रेमसंबंध विवाहामध्ये बदलण्यासाठी प्रयत्न करा. आई-वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या.
कुंभ राशी 2025 उपाय
कुंभ राशीसाठी वर्ष 2025 हे गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगले आहे. या वर्षी होणारे गुरूचे संक्रमण तुमच्यासाठी सामान्यत: अनुकूल असेल. पण शनी आणि राहूची स्थिती मात्र तुमच्यासाठी अनुकल नाही. शनि आणि राहूचा सकारात्मक परिणामासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील, ते पुढील प्रमाणे आहेत.
- शनिवारी श्वानाला पोळी किंवा भाकरी खाऊ घाला.
- प्रत्येक शनिवार पिंपळाच्या वृक्षाखाली जल आणि काळे तिळ अर्पण करा.
- प्रत्येक मंगळवारी सुंदरकांडचे पठण करा.
- “ॐ रां राहवे नमः” या राहूच्या मंत्राचा जप करा.
- पूजेमध्ये चंदन अगरबत्ती आणि धूपाचा वापर करा.