मासिक अंक ज्योतिष जानेवारी 2025: या जन्मतारखेच्या लोकांना धनलाभासह ऑफिसच्या कामात प्रगती! मोठे बदल टेन्शन वाढविणार ! वाचा अंकशास्त्रानुसार जानेवारी चे राशीभविष्य

Numerology Horoscope, January 2025: नवीन वर्षाचा पहिला महिना सर्व मूलांकासाठी चांगले तसेच थोडे कटू अनुभव घेवून येणार आहे. जानेवारी महिन्यात मूलांक 1 साठी धनलाभाचे योग, तर मूलांक 2 चे लवलाइफ उत्तम, मूलांक 4 असणाऱ्यांचा ज्येष्ठ व्यक्तींवर जास्त खर्च होणार. मूलांक 6 साठी प्रोजेक्टबद्दल चांगली बातमी मिळेल. मूलांक 8 धनवृद्धीचे शुभ योग तर मूलांक 9 चे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होणार. चला तर जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते मूलांक 9 असलेल्या लोकांना जानेवारी महिना कसा जाईल ते जाणून घेऊ.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

January 2025 Monthly Ank Rashifal : नवीन वर्षाचा पहिला महिना, जानेवारी सगळ्यांसाठी शुभ योग घेवून आलेला आहे. मूलांक 1 सह या मूलांकांना धनलाभाचे योग असून मेहनतीचे फळ मिळेल. मूलांक 5 सह या मूलांकांचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाल्याने मन प्रसन्न असेल. या मूलांकाच्या लोकांसाठी आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. चला तर जाणून घेऊया, जन्मतारीखानुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी जानेवारी महिना कसा राहील.

मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): धनलाभाचे योग

लवलाइफमध्ये आनंद असून नाते वृद्धींगत होईल. या महिन्यात तुमच्या कार्यक्षेत्रातही हळूहळू सुधारणा दिसून येते आहे. आर्थिक बाबतीत जानेवारी महिना शुभ असून गुंतवणुकिचे योग आहेत. या महिन्यात धनलाभाचे योग आहेत. महिन्याच्या शेवटी मेहनतीचे फळ नक्की मिळेल.

मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): लवलाइफ उत्तम

जानेवारी महिन्यात लवलाइफ उत्तम असून जोडीदारासोबत पार्टी मूडमध्ये असाल. नवीन मित्र होऊ शकतात. कार्यक्षेत्रात एखाद्या नवीन प्रोजेक्टविषयी थोडा संभ्रम असू शकतो, पण शेवटी तो प्रोजेक्ट तुम्ही यशस्वी करून दाखवाल. वरिष्ठांना साथ द्या अन्यथा त्यांचा स्वाभिमान दुखावला तर तुम्हालाचा त्रास होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या शेवटी एखद्या नवीन गोष्टीचा आरंभ होणार आहे, त्यामुळे मनाला समाधान मिळेल.

मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): मेहनतीचे फळ मिळेल

या महिन्यात तुमच्या लवलाइफमध्ये सुख- समृद्धीचे योग आहेत. जानेवारीच्या सुरूवातीला मेहनतीचे फळ मिळेल त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. आर्थिक बाबतीत खर्च जास्त होऊ शकतो, तेव्हा सतर्क राहा आणि जे काही कराल त्यावर सखोल विचार करा. जानेवारीच्या शेवटी एखादा निराशाजनक बातमी मिळाल्यामुळे मन दुखावले जाईल.

मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): ज्येष्ठ व्यक्तींवर जास्त खर्च होणार

आर्थिक बाबतीत परिस्थिती अनुकूल असून धन प्राप्तीचे योग प्रबळ आहेत. दरम्यान घरातील ज्येष्ठ व्यक्तींवर जास्त खर्च होणार आहे. कार्यक्षेत्रात संवाद साधून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा, चांगले परिणाम मिळतील. प्रेम संबंधांमध्ये मानसिक तणाव वाढतो आहे, कटाक्षाने लक्ष द्या. महिन्याच्या शेवटी दोन प्रोजेक्ट्स मिळण्याचे योग असून त्यात भरपूर लाभ आहे.

मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): प्रोजेक्ट यशस्वी होणार

कार्यक्षेत्रात प्रगती असून तुम्ही प्रगतीच्या मार्गावरून वाटचाल करत आहात. प्रोजेक्टद्वारे यश मिळेल. आर्थिक बाबतीत स्थिती उत्तम असून धनलाभाचे योग आहेत. प्रेमसंबंध उत्तम असून नाते अधिक वृद्धींगत होईल. रिलोकेशचा विचार करत आहात त्यात यश मिळेल. जानेवारीच्या शेवटी जीवनात सुख- समृद्धीचे योग आहेत.

मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): प्रोजेक्टबद्दल चांगली बातमी मिळेल

आर्थिक बाबतीत स्थिती ठिक आहे. पण गुंतवणुक करणे थांबवू नका. कार्यक्षेत्रात चढउतार आहे. जानेवारीमध्ये प्रोजेक्टबद्दल चांगली बातमी मिळेल. कोणत्याही प्रोजेक्टमध्ये संवाद साधून प्रश्न लागतील हे लक्षात ठेवा. प्रेमसंबंधांमध्ये नाराजीचे सुर आहेत. या महिन्याच्या शेवटी प्रियजनांसोबत सुखद वेळ व्यतीत करणार आहात.

मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): एक नवीन सुरुवात होणार

या महिन्यात प्रेमसंबंधात मोठा बदल दिसेल. एक नवा आरंभ जीवनात होतो आहे, तयार राहा. कार्यक्षेत्रात तुम्ही जे काही बोलला होतात किंवा वचन दिले होते ते पूर्ण होताना दिसणार नाही. एक बॅकअप योजना तयार ठेवा. आर्थिक बाबतीत गुंतवणुक चांगले परिणाम देईल. जानेवारीच्या शेवटी जीवनात हळूहळू सुधारणा दिसून येईल.

मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): धनवृद्धीचे शुभ योग

कार्यक्षेत्रात सुखद काळ येणार असून प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत परिस्थिती अनुकूल असून धनवृद्धीचे शुभ योग आहेत. प्रेमसंबंधांमध्ये मतभेद वाढू शकतात, तेव्हा संयम ठेवून निर्णय घ्या. या महिन्याच्या शेवटी वेळ ठिक आहे पण सकारात्मक विचारांनी कामे मार्गी लावा.

मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होणार

कार्यक्षेत्रात प्रगती असून कलात्मक कामात मोठ यश मिळेल. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. प्रेम संबंधांमध्ये सुखद वेळ असून, मन प्रसन्न राहील. या महिन्याच्या शेवटी सुख – समृद्धीचे शुभ योग आहेत.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

masik Ank Jyotish January 2025Monthly horoscope in marathiआजचे भविष्यआजचे राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्सकुंडली विषयी बातम्याराशी भविष्य
Comments (0)
Add Comment