Today Horoscope 1 january in Marathi, आजचे राशीभविष्य:
आज बुधवार १ जानेवारी चंद्र मकर राशीत असणार आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस असून पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. तसेच उत्तराषाढा नक्षत्र, व्याघ्रात योग आणि बालव करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा आहे.
आज बुधवार १ जानेवारी चंद्र मकर राशीत असणार आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस असून पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. तसेच उत्तराषाढा नक्षत्र, व्याघ्रात योग आणि बालव करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. तुमच्यामुळे सहकाऱ्यांचा मूड खराब होईल. आज मुलांकडून काही निराशाजनक बातम्या ऐकू येतील. जोडीदाराशी काही वाद होतील. समस्या सोडवण्यात यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी एकामागून कामे सोपवली जातील. कामात व्यस्त राहाल. प्रेमीजीवन जगणाऱ्यांना सुखद अनुभव मिळतील. विद्यार्थ्यांना येणारे अडथळे दूर होतील. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – त्रास होईल
आजचा दिवस तुमच्या प्रगतीचा असेल. तुम्ही इतरांना मदत कराल. कामाच्या ठिकाणी काही बदल कराल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. तुमच्यामुळे सहकाऱ्यांचा मूड खराब होईल. आज मुलांकडून काही निराशाजनक बातम्या ऐकू येतील. जोडीदाराशी काही वाद होतील. समस्या सोडवण्यात यशस्वी होतील.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगावर दूध अर्पण करा.
वृषभ – संकटाचा सामना करावा लागेल
आज तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. कुटुंबातील कोणत्याही शुभ कार्यक्रमावर चर्चा कराल. कुटुंबातील मोठ्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. खर्चामध्ये समतोल राखावे लागेल. भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना मदत करा.
मिथुन – कामात व्यस्त असाल
आज तुम्हाला वडिलांच्या किंवा उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेने काही मालमत्ता मिळू शकते. ज्यामुळे तुमची संपत्तीची इच्छा देखील पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी एकामागून कामे सोपवली जातील. कामात व्यस्त राहाल. प्रेमीजीवन जगणाऱ्यांना सुखद अनुभव मिळतील. विद्यार्थ्यांना येणारे अडथळे दूर होतील.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या
कर्क – बढती मिळेल
आज व्यवसायाच्या संदर्भात लांबच्या प्रवासाला जावे लागेल. चांगली बातमी मिळेल. परीक्षेसाठी अर्ज कराल. नवीन व्यवसाय करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. अधिकाऱ्यांच्या कृपेने बढती मिळेल.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा खाऊ घाला.
सिंह – यश मिळेल.
आज राजकारणातील संबंधित लोकांना यश मिळेल. सार्वजनिक पाठिंबा वाढवण्यात यशस्वी व्हाल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याने आनंदी असाल. कौटुंबिक समस्यांमध्ये भावाच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. वडिलांना डोळ्याशी संबंधित काही समस्या येतील.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीची पूजा करा.
कन्या – आर्थिक लाभ होतील
आज तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावे लागणार आहे. अन्यथा काम खराब होईल. कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभामुळे मन प्रसन्न राहिल. बचाव करण्याकडेही लक्ष द्यावे लागेल. मोठ्यांची सेवा करण्यात वेळ घालवाल. कोणताही वाद निर्माण झाल्यास टाळा.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा.
तुळ – त्रास होईल
आज कुटुंबात काही कलह चालू असतील तर ते नव्याने वर येतील. त्यामुळे मन थोडे अस्वस्थ राहिल. तुम्हाला वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. सरकारी नोकरीशी संबंधित कोणतेही काम हाती घेतले तर ते पूर्ण करावे, अन्यथा त्रास होईल. मित्रांसाठी पैशांची मदत करावी लागेल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला.
वृश्चिक – संपत्तीत वाढ
आज तुमची संपत्ती वाढवण्यासाठी काही काम करावे लागेल. व्यवहार फायदेशीर ठरेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तयार असाल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. व्यवहार फायदेशीर होतील. प्रलंबित कामे पूर्ण कराल. मुलांच्या काही गरजा खरेदी करण्यासाठी पैसे खर्च कराल.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गायत्री मंत्राचे पठण करा.
धनु – पैसे अडकतील
आज तुमच्या घर आणि व्यवसायात खर्चाला सामोरे जावे लागेल. खर्च करताना उत्पन्न लक्षात ठेवावे लागेल. तुमची संपत्ती कामी होऊ शकके. पैस उधार देण्याचा अजिबात विचार करु नका. पैसे अडकू शकतात.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. हनुमानाला शेंदूर अर्पण करा.
मकर – वाहन जपून चालवा
आजचा दिवस तुम्हाला व्यावायिक क्षेत्रात लाभ मिळतील. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. वाहन जपून वापरा. वाहन अचानक बिघडल्याने आर्थिक खर्च वाढेल. प्रेम जीवनात वाद होतील. जोडीदार तुमच्यावर रागवू शकतो. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. पैसे कुठेतरी अडकतील.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुची आराधना करा.
कुंभ – समस्या येतील
आज तुमच्या आईची तब्येत अचानक बिघडेल. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. काही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भविष्यात फसवणूक होईल.
आज भाग्य ७४ टक्के तुमच्या बाजूने असेल. विष्णुसहस्त्रनामाचे पठण करा.
मीन – कामात यश मिळेल
आज कोणाकडून कर्ज घेण्याचा विचार असेल तर सहज मिळेल. व्यावसायिक समस्येमुळे त्रस्त असाल. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहिल. मुलांना कामात यश मिळेल. स्वत:साठी वेळ काढाल.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.