Yearly Money Career Horoscope 2025 : वर्ष 2025 मध्ये ग्रहांंचे राशी परिवर्तन जास्त प्रमाणात होणार आहे. शनि ग्रह मीन राशीत प्रवेश करणार तर त्याचवेळी राहू आणि केतु देखील राशी परिवर्तन करणार आहेत. राहू 18 मे ला मीन राशीपासून कुंभ राशीत आणि केतु कन्या राशीपासून सिंह राशीत प्रवेश करतील. ग्रहांच्या या शुभ प्रभावामुळे कर्क आणि कुंभसह 5 राशींना या वर्षी उत्तम यश मिळेल. प्रत्येक कामात नशिबाची साथ, प्रोजेक्ट वेळत पूर्ण होणार, धनप्राप्तीचे योग, परदेशात प्रवास होणार आहे. चला तर पाहुया, करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वर्ष 2025 सर्व राशींसाठी कसे असेल? मेष ते मीन राशींसाठी वार्षिक आर्थिक आणि करिअर राशीभविष्य.
मेष वार्षिक आर्थिक राशिभविष्य: परदेशात प्रवासाचे योग, आर्थिक स्थिती उत्तम
मेष राशीच्या लोकांसाठी या वर्षी शनीची साडेसाती सुरू होणार आहे आणि यामुळे जीवनात अनेक बदल दिसू शकतात. एप्रिल आणि मे महिन्यात तुमच्यासाठी जास्त कष्ट आहेत. तसेत या काळात घरातील वातावरण नाराजीचे असेल. कार्यक्षेत्रात चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतील. परदेशातील प्रवासाचा योग बनतो आहे. नशिबाची साथ आणि अचानक धनलाभाचे शुभ योग मन प्रसन्न करतील. वडिलोपार्जीत संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. तब्येतीची खास काळजी घ्यावी लागेल. कारण नोव्हेंबरमध्ये तब्येत जास्त बिघडण्याची शक्यता आहे. मे महिन्यात राहूचे संक्रमण शुभ ठरणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा, शेअर बाजार किंवा प्रॉपर्टीमध्ये दुप्पट फायदा होऊ शकतो. गुरुचे संक्रमण शुभ फळ देईल. शनीच्या संक्रमणामुळे साडेसातीची सुरुवात होईल.
वृषभ वार्षिक आर्थिक राशिभविष्य : करिअरमध्ये उत्तम प्रगती, धनप्राप्तीचे योग
वृषभ राशीच्या लोकांसाठी या वर्षाची सुरूवात सुख-समृद्धीचा योग घेऊनच आलेली आहे. हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम राहील आणि तुमचा मान-सन्मान वाढेल. मे महिन्यापर्यंत शुक्र एकादश स्थानात असतील त्यामुळे चोहोबाजूंनी शुभलाभाची संधी तयार होईल. कार्यक्षेत्रात चांगले योग तसेच बॉसची कृपा असणार आहे. सहकारी भरपूर मदत करतील. या वर्षी राजकीय मदतीचे योगही आहेत. कुटुंबाकडे मात्र तुम्ही अधिक लक्ष देऊ शकणार नाही. 28 मे पासून राहूचे संक्रमण चांगले परिणाम घेऊन येईल. कार्यक्षेत्रात प्रगती आणि धनप्राप्तीचे शुभ योग तयार होतील. गुरुचे संक्रमण शुभलाभा देणारे आहे. तुमची भाग्यवृद्धी होईल आणि तुम्ही नवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार फायनल कराल. तुमच्या एकादश स्थानातील शनी प्रबळ असल्यामुळे शुभयोग तयार होत असून करिअरमध्ये उत्तम प्रगती आहे.
मिथुन वार्षिक आर्थिक राशिभविष्य : कार्यक्षेत्रात प्रगती, मेहनतीचे फळ मिळणार
मिथुन राशीच्या जातकांसाठी 2025 हे वर्ष शुभ योग घेऊन येणार आहे. जीवनात काही चढ-उतार असतील पण सुख आणि शांती नक्की मिळणार आहे. कार्यक्षेत्रात उत्तम परिस्थिती निर्माण होईल, तुम्ही प्रगतीपथावरून वाटचाल करणार आहात. मेहनतीच्या जोरावर तुम्ही बऱ्याच गोष्टी साध्य करू शकाल. आर्थिक दृष्टिकोनातून स्थिती सामान्य राहील, पण एप्रिल, मे आणि डिसेंबर महिन्यात अडचणींचा सामना होणार. या वर्षाचा उत्तरार्ध यश आणि मानसिक शांतता देणार आहे. वर्षाच्या सुरूवातीला शुक्र आणि शनि तुम्हाला जीवनात बल देणार तर गुरु तुमच्यासाठी शुभ फल घेऊन येणार आहे. राहूचा संक्रमणामुळे धार्मिक कार्यांमधील रुची वाढेल. विद्यार्थ्यांसाठीही हे संक्रमण उत्तम आहे. वर्षाच्या शेवटी गुरु कर्क राशीमध्ये प्रवेश करून धनप्राप्तीचे योग निर्माण करणार आहे. संततीसुख, विवाहाचे योग तयार होतील आणि प्रत्येक कामात नशिबाची साथ असेल. मेहनतीचे फळ मिळणार असून कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
कर्क वार्षिक आर्थिक राशिभविष्य : प्रॉपर्टीमध्ये फायदा, वाहन खरेदीचा योग
कर्क राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शनिच्या ढैय्यापासून यावर्षी मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे अनेक अडचणींमधून तुम्ही बाहेर येणार आहात. हे वर्ष तुम्हाला सामान्य लाभ देईल. करियरमध्ये अडचणी आहे आणि प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक गोष्टी जून महिन्यानंतर उत्तम होतील. राहूचे संक्रमण संशोधन कार्यातील तुमची रुची वाढवेल. गुरुचे संक्रमण मध्यम परिणाम देईल. योग आणि ध्यान – धारणा यात अधिक आवड निर्माण होईल. शनिच्या ढैय्यापासून मुक्त झाल्याने रिलॅक्स वाटेल. जोडीदारासोबत संबंध सुधारतील. प्रॉपर्टीमध्ये फायदा असून वाहन खरेदी करणार आहात.
सिंह वार्षिक आर्थिक राशिभविष्य : परदेशातील प्रवास, धनप्राप्तीचे योग
सिंह राशीसाठी कठोर मेहनत आहे तसेच नशिबाची फार साथ मिळणार नाही. एप्रिल आणि मे महिन्यातही परिस्थिती अशीच राहील. पण काळजी करु नका कार्यक्षेत्रात प्रगती होईल. वर्षाच्या सुरूवातीला परदेशातील प्रवास आणि धनप्राप्तीचे योग आहेत. या वर्षी शनिची ढैय्या सुरू होईल, त्यामुळे पायांचा त्रास वाढेल. राहूचे संक्रमण तुम्हाला व्यावसायिक भागीदारीमध्ये फायदे देणार आहे. प्रत्येक कामात जोडीदाराची मदत मिळेल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचारही तुम्ही करू शकता. गुरुचे संक्रमण शुभ परिणाम देणार आहे. धनप्राप्तीच्या संधी निर्माण होतील. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष शुभ आहे. सिंह राशीवर शनिची ढैय्या असल्यामुळे तब्येतीची काळजी घ्या.
कन्या वार्षिक आर्थिक राशिभविष्य : कार्यक्षेत्रात प्रगती, मान-सन्मान वाढेल
कन्या राशीसाठी हे वर्ष चांगले परिणाम देणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती आणि मान-सन्मान वाढेल. नशिबाची साथ असल्यामुळे धनवृद्धीचे शुभ योग आहेत. ऑक्टोबरमध्ये तुम्हाला काही कष्ट भोगावे लागू शकतात. एप्रिल आणि मे महिन्यात अपघात होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहणे महत्त्वाचे आहे. या वर्षी तब्येतीत सुधारणार होणार असून तुम्ही नवीन जीवनशैलीनुसार मार्गक्रमण करणार आहात. मे महिन्यातील राहूचे संक्रमण शुभ परिणाम देईल. कर्जातून मुक्ती आणि विरोधकांवर मात कराल. दशम स्थानातील गुरुचे संक्रमण धनलाभ आणि कार्यक्षेत्रात प्रगती देणारे ठरेल. घरामध्ये काही बांधकाम कराल किंवा घराची दुरुस्ती करणार आहात. कार्यक्षेत्रात बॉसची कृपा राहील तसेच व्यवसाय, भागीदारीतही नवीन पद्धतीमुळे भरपूर प्रगती होईल.
तुळ वार्षिक आर्थिक राशिभविष्य : खर्च वाढणार आहे
तुला राशीच्या लोकांसाठी हे वर्ष शुभ आहे. वर्षाच्या उत्तरार्धात स्थिती अनुकूल असून सुख-समृद्धीचे योग तयार होत आहेत. जानेवारी, एप्रिल आणि मे महिन्यात खर्च जास्त होऊ शकतो, तेव्हा आत्तापासून काळजी घ्या. विद्यार्थी वर्गासाठीही हे उत्तम वर्ष आहे. कार्यक्षेत्रात मे महिन्यानंतर चांगले परिणाम दिसून येतील आणि नोव्हेंबर-डिसेंबर उत्तम असेल. कर्जांपासून मुक्ती मिळू शकते. नवीन उत्पन्नाचे स्त्रोत खुले होतील पण खर्चही जास्त आहे. मे महिन्यात राहूचे संक्रमण संतती सुख देणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ उत्तम आहे. अचानक धनप्राप्तीचे शुभ योग तयार होतील. मान-सममान वाढेल. गुरुचे संक्रमण दुप्पट फळ देणार आहे. लहान भावंडांशी संबंध सुधारतील. कोर्ट कचेरी सुरु असेल तर निर्णय तुमच्या बाजूने लागेल.
वृश्चिक वार्षिक आर्थिक राशिभविष्य : उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होणार
वृश्चिक राशीच्या जातकांसाठी या वर्षी शनिची ढैय्या संपुष्टात येईल त्यामुळे जीवनात सुख शांती आणि समाधान असेल. कार्यक्षेत्रात यश मिळेल, पण मन बचैन असेल. ज्योतिषी, हेल्थ वर्कर, शिक्षक यांसाठी हे वर्ष करियरमध्ये प्रगती घेऊन येणार आहे. शिक्षण आणि करियरमध्ये प्रगती असून, तुम्ही कुठे मुलाखत दिली असेल तर यश मिळेल. एप्रिल आणि मे महिन्यात मेहनतीचे फळ मिळणार आहे. या वर्षात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील, पण खर्चही जास्त आहे. राहूचे संक्रमण घरात मोठे बदल करणार आहे. नवीन वाहन खरेदी करू शकता. या वर्षात शनि ची ढैय्या संपल्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.
धनु वार्षिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक स्थितीत सुधारणा
धनु राशीच्या लोकांसाठी वर्षाच्या सुरूवातीला घरासंदर्भात सुख-समृद्धीचे शुभ असून घरातील वातावरण आनंदी असेल. घरात दुरुस्तीचे काम करणार आहात तसेच वाहन खरेदी करू शकता. कुटुंबासोबत सुखद वेळ व्यतीत कराल. मे महिन्यानंतर विवाहाचे शुभ योग तयार होत आहेत. मीडिया आणि व्यापार क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम फायदा मिळेल. वर्षाच्या सुरूवातीला धनवृद्धीसाठी शुभ योग असून, एकूण आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. राहूचे संक्रमण जीवनातील यशाच्या मार्ग खुले करेल तर गुरुचे संक्रमणजीवनात सुख-शांती घेऊन येईल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता, चांगला फायदा मिळेल. या वर्षात शनिची ढैय्या लागल्यामुळे कुटुंबाच्या बाबतीत काळजी वाढेल. कामे वेळत पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करा.
मकर वार्षिक आर्थिक राशिभविष्य : धनवृद्धीचे शुभ योग, मेहनतीचे फळ मिळणार
मकर राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष उत्तम असून धनवृद्धीचे योग आहेत. काही ना काही मार्गाने धनप्राप्ती होईल. कार्यक्षेत्रात वर्षाच्या सुरूवातीला सुधारणा असेल आणि मान-सन्मान वाढेल. कोणताही प्रोजेक्ट तुम्ही अगदी सहज पूर्ण कराल. जीवनात सुख-समृद्धी मिळेल. जानेवारी, एप्रिल आणि मे महिन्यात जोडीदारासोबत नाराजीचा सुर असेल. यावर्षी तब्येत चांगली असेल. मे महिन्यात राहूचे संक्रमण धनवृद्धी करणार आहे तुमच्या बोलण्याने तुम्ही इतरांना प्रभावित करू शकता. गुरुचे संक्रमण मात्र काही समस्या निर्माण करू शकते. वर्षाच्या शेवटी कर्क राशीमध्ये गुरुचे संक्रमण शुभ परिणाम देईल. तर शनिचे संक्रमण मेहनतीला बळ देईल. या वर्षी तुम्ही मेहनत आणि कौशल्याने यश मिळवणार आहात.
कुंभ वार्षिक आर्थिक राशिभविष्य : सुख-समृद्धीचे शुभ योग
कुंभ राशीच्या लोकांसाठी हे उत्तम असून, प्रत्येक बाबतीत सुख-समृद्धीचे शुभ योग आहेत. वर्षाच्या सुरूवातीला होणारे शनिचे संक्रमण मान-सन्मान वाढवणार आहे. कार्यक्षेत्रात काही उतार-चढाव येतील, पण एप्रिल आणि मे महिन्यात कष्ट वाढू शकतात. तुम्ही टेन्शन घेऊ नका, कामात सुधारणा होणार आहे. धनवृद्धीचे चांगले योग आणि गुंतवणुकीमुळे लाभ आहे. वर्षाच्या सुरूवातीला ज्येष्ठ महिलेच्या मदतीमुळे धनप्राप्ती होऊ शकते. नशिबाची साथ असून धनवृद्धी होईल. यावर्षी मिळकतीचे अनेक मार्ग खुले होतील. तब्येतीत थोडी तक्रार असेल, तरी वर्षाच्या शेवटी सुधारणा होईल. या वर्षी तुमच्या वैवाहिक जीवनात थोडी नाराजी असेल, अगदी संपूर्ण वर्षभर उतार-चढाव असतील. राहूचे संक्रमण जीवनशैलीत मोठे बदल करेल तसेच राजकीय लोकांकडून तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी वेळ शुभ असून परीक्षेत उत्तम यश मिळेल. गुरुचे संक्रमण सुख-समृद्धीचे योग घेऊन येणार आहे.
मीन वार्षिक आर्थिक राशिभविष्य : कठोर मेहनत, कार्यक्षेत्रात प्रगती
मीन राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष सुख-दुःख असे दोन्ही अनुभव देणारे आहे. वर्षाच्या सुरूवातीला मे महिन्यापर्यंत शुक्राच्या उच्च स्थितीमुळे सुख-समृद्धीचे योग आहेत. तसेच मान-सन्मान वाढेल. तुम्ही कौशल्य आणि हुशारीचा वापर करून अनेक अडचणींवर मात करू शकाल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. मात्र, मे महिन्यानंतर अचानक प्रोजेक्टमध्ये तुफान यश मिळेल. परदेशात जाण्याचे योग आहेत आणि व्यवसायानिमित्त जाणे झाले तर फायदा तुमचाच आहे. मे महिन्यापर्यंत विवाहाचे शुभ योग बनतील आणि वैवाहिक जीवन सुखी राहील. तब्येतीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. उत्पन्नात वाढ पण खर्चही जास्त होईल. शनिच्या साडेसातीमुळे तुम्हाला यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. करिअरमध्ये सुखद अनुभव आहेत पण, राहूच्या दृष्टीमुळे थोडी अस्वस्थता असेल. ध्यान आणि योगा आवर्जून करा.