Budh Gochar 2025 : बुधाचे धनु राशीत संक्रमण! सिंहसह ६ राशींना नोकरीत फायदा, व्यापारात होईल जबरदस्त वाढ

Mercury Transit In Sagittarius 2025 : नवीन वर्षात बुध ग्रहाचे संक्रमण जानेवारी महिन्यात होणार आहे. बुध ग्रह हा नोकरी, बुद्धीमत्ता आणि व्यवसायासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. ४ जानेवारीला बुधाचे संक्रमण धनु राशीत होणार आहे. बुधाच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडणार आहे. जानेवारी महिन्यात बुधाच्या संक्रमणामुळे ६ राशींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Budh Gochar in Dhanu Rashi :
नवीन वर्षात बुध ग्रहाचे संक्रमण जानेवारी महिन्यात होणार आहे. बुध ग्रह हा नोकरी, बुद्धीमत्ता आणि व्यवसायासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. ४ जानेवारीला बुधाचे संक्रमण धनु राशीत होणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा तर्कशक्ती, ज्ञान, बुद्धिमत्ता, संवाद कौशल्याचा कारक ग्रह आहे. त्याला ग्रहांच्या राजकुमाराचा दर्जाही प्राप्त होतो. बुधाच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडणार आहे. जानेवारी महिन्यात बुधाच्या संक्रमणामुळे ६ राशींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

बुध संक्रमणाचा मेष राशीवर प्रभाव

बुधाचे संक्रमण मेष राशीत नवव्या घरात होणार आहे. या काळात बोलण्यामुळे अनेकांना प्रभावित कराल. तुमचे संवाद कौशल्य अधिक मजबूत होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होईल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना बुधाच्या संक्रमणामुळे लाभ होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदाराची साथ मिळेल.

बुध संक्रमणाचा मिथुन राशीवर प्रभाव

बुधाचे संक्रमण सातव्या घरात होणार आहे. या काळात तुमच्या वडिलांच्या मदतीने अनेक पूर्ण होतील. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळू शकते. नोकरीत असलेल्या अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रभावही वाढेल. धार्मिक कार्यात पैसा खर्च कराल. इतरांना मदत कराल. मुलांच्या यशाबद्दल अभिमान वाटेल. संक्रमण काळात मिथुन राशीच्या लोकांसाठी परदेशात प्रवासाचीही शक्यता आहे.

बुध संक्रमणाचा सिंह राशीवर प्रभाव

बुध सिंह राशीत पाचव्या स्थानात प्रवेश करणार आहे. या काळात तुमचे जोडीदाराशी नाते घट्ट होईल. जोडीदारासोबत घरात धार्मिक कार्यक्रमही सुरु करु शकता. नवीन व्यवसाय वाढवण्याच्या स्थितीत असाल. नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करायची असेल तुमची इच्छा या काळात पूर्ण होईल. संवाग कौशल्य चांगले असेल. आजूबाजूचे वातावरण सकारात्मक राहिल.

बुध संक्रमणाचा कन्या राशीवर प्रभाव

कन्या राशीत बुध चतुर्थ स्थानात असणार आहे. या काळात तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात शुभ परिणाम मिळतील. कुटुंबातील एखाद्या सदस्यांला सरकारी योजनांचा लाभ मिळेल. व्यावसायिक प्रगतीसाठी अनेक नवीन योजना राबवाल. व्यवसायात चांगली प्रगती होईल.

बुध संक्रमणाचा तुळ राशीवर प्रभाव

बुध तुळ राशीत तिसऱ्या स्थानात असणार आहे. या काळात तुमची अनेक उद्दिष्टे साध्य करण्यात तुम्ही प्रयत्न कराल. आयुष्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. सरकारी नोकरीत विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. अविवाहित लोकांच्या आयुष्यात कुणीतरी प्रवेश करेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल.

बुध संक्रमणाचा कुंभ राशीवर प्रभाव

बुध कुंभ राशीत अकराव्या स्थानात असणार आहे. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. अडकलेला पैसा मिळू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना शुभ परिणाम मिळतील. तुमची कारकीर्द वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस.आणखी वाचा

Source link

Budh Gochar 2025Budh Gochar in Dhanu Rashimercury transit in sagittariusकसा पडेल बुध संक्रमणाचा प्रभावबुध गोचर २०२५बुधाचे धनु राशीत संक्रमणबुधाचे संक्रमण २०२५
Comments (0)
Add Comment