‘बोंबिलवाडी’च्या हिटरलनं पहिल्याच दिवशी गाजवलं बॉक्स ऑफिस, तब्बल इतक्या लाखांची कमाई

Mukkam Post Bombilwaadi box office collection: गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सिनेमाची चर्चा होती तो ‘मु. पो. बोंबिलवाडी’ सिनेमा आता प्रदर्शित झालाय. पहिल्या दिवशी सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: परेश मोकाशी लिखित-दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी व भरत शितोळे निर्मित ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हा सिनेमा मराठी मनोरंजन सृष्टीसाठी नववर्षाची सुखद सुरुवात घेऊन आला आहे. अभिनेते प्रशांत दामले यांना बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. १ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी सिनेमाची तगडी कमाई झाली आहे.

‘मु. पो. बोंबिलवाडी’सिनेमाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. या सिनेमात मुख्य भूमिकेत म्हणजेट हिटलरच्या भूमिकेत कोण असणार? याबद्दल उत्सुकता होती. अखेर प्रशांत दामलेंचा पहिला लुक समोर आला आणि प्रेक्षकांनी एकच कौतुक केलं. सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद होता. त्यामुळं सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता पहिल्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत.


कमाई किती?

तर sacnilk नुसार पहिल्या दिवशी सिनेमानं तब्बल ६१ लाखांची कमाई केली आहे. मराठी सिनेमासाठी हे सकारात्मक असे आकडे आहेत. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी सिनेमा पाहायला गर्दी केली होती. यात महिलाप्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर होता. तर अनेकांनी कुटुंबियांसोबत हा सिनेमा पाहून नवीन वर्षाची सुरुवात केली.

आता विकेंडला सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर येत्या काही दिवसात माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यात कितपत यशस्वी ठरतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इथे वाचा सिनेमाचा रिव्ह्यू

‘बोंबिलवाडी’च्या हिटरलनं पहिल्याच दिवशी गाजवलं बॉक्स ऑफिस, तब्बल इतक्या लाखांची कमाई


…आणि मी होकार दिला !

मी मध्यंतरी मधुगंधा कुलकर्णीला एक मेसेज पाठवला होता, की काही नकारात्मक छटा असलेली व्यक्तिरेखा असल्यास करायला मला नक्की आवडेल. दरम्यान, एकीकड ‘शिकायला गेलो एक’ या माझ्या नाटकाच्या तालमी ठरल्या होत्या आणि मधुगंधाचा मेसेज आला, ‘एक भूमिका आहे. तिला नकारात्मक छटा नाही; पण तरीही ती नकारात्मक आहे’. नाटकाच्या तालमींमुळं चित्रीकरणासाठी तारखांची जुळणी होणार नाही, असं वाटलं होतं. मात्र, माझ्या नाटकाचा दिग्दर्शक अद्वैत दादरकरच्या तारखा त्यांच्याकडं होत्या म्हटल्यावर माझ्या तारखा मिळणं सहज शक्य होतं; शिवाय परेश मोकाशी लेखन करतोय म्हटल्यावर ती प्रयोगशीलच असणार, यावर माझा विश्वास होता, म्हणून मी सिनेमाला होकार दिला, असं प्रशांत दामले म्हणाले.

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”आणखी वाचा

Source link

Mukkam Post Bombilwaadimukkam post bombilwaadi box office collectionMukkam Post Bombilwaadi cast and storyprashant damleपरेश मोकाशीप्रशांत दामलेमराठी सिनेमा बॉक्स ऑफिस अपडेट्समु. पो. बोंबिलवाडी चित्रपट कमाईमु. पो. बोंबिलवाडी बॉक्स ऑफिस कलेक्शनमु.पो. बोंबिलवाडी
Comments (0)
Add Comment