इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक ऊर्जा तसेच दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी स्वीकारला विभागाचा पदभार – महासंवाद




मुंबई, दि. २:  इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक ऊर्जा तसेच दुग्धविकास विभाग मंत्री अतुल सावे यांनी विभागाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच श्री.सावे यांनी अपारंपरिक ऊर्जा विभागाचा आढावा घेतला.

मंत्रालय परिसरातील महापुरूषांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्री. सावे यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात पदभार स्वीकारला. यावेळी विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

अपारंपरिक ऊर्जा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. पुढील शंभर दिवसांत या योजनांना गती देण्यात येईल, असेही अपारंपरिक ऊर्जामंत्री श्री.सावे यांनी सांगितले. यावेळी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

 







Source link

Comments (0)
Add Comment