Shukrawar Dhan Laxmi Sathi Upay: नवीन वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी धनिष्ठा नक्षत्राचा शुभ योग जुळून आलेला आहे. वेदिक ज्योतिषशास्त्रामध्ये धनिष्ठा नक्षत्राला लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. या शुभ योगात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केले जातात, ज्याचा तुमच्या जीवनावर तात्काळ परिणाम दिसून येतो असे सांगितले जाते. चला तर जाणून घेऊया ते सोपे उपाय, ज्यामुळे माता लक्ष्मीची सदैव तुमच्यावर कृपादृष्टी राहील.
सकाळी मुख्य दरवाज्यासमोर हा उपाय
नवीन वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी ब्रह्म मुहूर्तात उठून स्नान करा. त्यानंतर तांब्याच्या पातेल्यात स्वच्छ पाणी घ्या, त्यात थोडी हळद आणि झेंडुची फुले घाला. आता हे जल घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंवर शिंपडा. असे केल्यामुळे घर शुद्धत होते आणि लक्ष्मीचे आगमन होते. घराचे मुख्यद्वार म्हणजे लक्ष्मीचे स्थान मानले जाते. घरात येण्यासाठी जे मुख्य स्थान आहे ते पवित्र केले तर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
गायीची सेवा करा
नवीन वर्षाच्या पहिल्या शुक्रवारला गायीची सेवा करा. हिंदु धर्मात गायीला खूप महत्त्व आहे. गो मातेची सेवा करणे हे पुण्य कार्य मानले जाते. तुम्ही गायीला हिरवा चारा द्या, समजा हिरवा पाला मिळाला नाही तर सव्वा किलो पालक खायला द्या. त्याचबरोबर कणकेत गूळ, चणे आणि हळद घालून ते गायीला खायला द्या, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील.
गरजवंताला घोंगडी दान करा
सध्या सगळीकडे थंडी आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी तुम्ही एखाद्या गरजवंताला घोंगडी किंवा लोकरीते कपडे दान करु शकता. या उपायानेही मात लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. हा उपाय केल्यामुळे करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि प्रमोशन मिळण्याचे योग तयार होतील. गरजू व्यक्तीला मदत केली तर मोठं पुण्य मिळतं असं शास्त्र सांगतं. तेव्हा हा उपाय आवर्जून करा.
संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात दिवा लावा
नवीन वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर स्नान करून ईशान कोपऱ्यात गायीच्या तूपाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंग घाला. त्याचबरोबर देवघरात दिवा लावून श्रीसूक्ताचे पठण करा. नंतर तुळशीसमोर आणि मुख्यदाराच्या दोन्ही बाजूंवर दिवा लावा. असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि सदैव तुमच्या कुटुंबावर तिचा आशिर्वाद कायम राहील.
माता लक्ष्मीला प्रिय वस्तूंचा नैवेद्य अर्पण करा
शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रिय वस्तूंचा नैवेद्य अर्पण करा. प्रदोषकाळात माता लक्ष्मीला दूध आणि मखाणे यापासून तयार केलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवा. तसेच गुलाबाची 5 फुले अर्पण करा. माता लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे. तुम्ही माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवला तर तिचा आशिर्वाद सैदेव तुमच्यावर राहील, तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता होणार नाही. ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे त्यांनी जर हा उपाय केला तर वर्षाच्या सुरूवातीला कर्ज फेडण्यात यश मिळेल आणि तुमची प्रगती होईल.