आजचे पंचांग 5 जानेवारी 2025: त्रिपुष्कर योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 5 January 2025 in Marathi: रविवार, ५ जानेवारी २०२५, भारतीय सौर १५ पौष शके १९४६, पौष शुक्ल षष्ठी रात्री ८-१५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा रात्री ८-१७ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ दुपारी २-३४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति पौष १५, शक संवत १९४६, पौष शुक्ल, षष्ठी, रविवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे २२, रज्जब ०४, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ५ जानेवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, षष्ठी तिथी रात्री ८ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ
शतभिषा नक्षत्र रात्री ८ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तरभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ, व्यतिपात योग सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर वरियान योग प्रारंभ, कौलव करण सकाळी ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणीज करण प्रारंभ, चंद्र दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१४
  • सूर्यास्त: सायं. ६-१४
  • चंद्रोदय: सकाळी ११-१७
  • चंद्रास्त: रात्री ११-३४

  • पूर्ण भरती: पहाटे ३-२० पाण्याची उंची ४.४५ मीटर, दुपारी ३-४१ पाण्याची उंची ३.६ मीटर,
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ९-४६ पाण्याची उंची १.१५ मीटर, रात्री ९-३० पाण्याची उंची १.२२ मीटर
  • सण आणि व्रत : त्रिपुष्कर योग, रवि योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २९ मिनिटांपासून ते ६ वाजून २३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १८ मिनिटांपासून ते ३ वाजेपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपासून ते ६ वाजून १२ मिनिटांपर्यंत. रवि योग सकाळी ७ वाजून १७ मिनिटांपासून ते ८ वाजून १८ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडेचार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ४ वाजून २४ मिनिटांपासून ते ५ वाजून ६ मिनिटांपर्यंत, पंचक पूर्ण दिवस राहणार.

आजचा उपाय
आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

5 january daily panchang5 जानेवारी दिनविशेष5 जानेवारी पंचांग 2025 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगत्रिपुष्कर योग
Comments (0)
Add Comment