Today Horoscope 5 january in Marathi, आजचे राशीभविष्य:
आज रविवार ५ जानेवारी चंद्र मीन राशीत जाणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी त्रिपुष्कर योग, रवियोग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सिंह, तूळ, धनु राशीसह इतर 5 राशींना लाभ मिळतील. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा आहे.
आज रविवार ५ जानेवारी चंद्र मीन राशीत जाणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी त्रिपुष्कर योग, रवियोग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सिंह, तूळ, धनु राशीसह इतर 5 राशींना लाभ मिळतील. मित्रांसोबत शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. समाजात तुमची कीर्ती आणि वैभव वाढेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नातेसंबंध मजबूत होतील. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तुमचे मन प्रसन्न राहिल. एखाद्या व्यक्तीसोबतचा सौदा तोट्याचा ठरेल. शुभ कार्यक्रमावर चर्चा होईल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – सन्मान वाढेल
आज व्यवसायात लाभ झाल्याने मनाला शांती मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. काही पैसे खर्च करावे लागतील. मित्रांसोबत शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. समाजात तुमची कीर्ती आणि वैभव वाढेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नातेसंबंध मजबूत होतील. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
आज भाग्य ७५ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा
वृषभ – नुकसान होईल
आज तुम्हाला व्यवसायाच्या योजनांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. निष्काळजी राहिल्यास मोठे नुकसान होईल. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. तुमचे मन प्रसन्न राहिल. एखाद्या व्यक्तीसोबतचा सौदा तोट्याचा ठरेल. शुभ कार्यक्रमावर चर्चा होईल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा.
मिथुन – पदोन्नतीमध्ये अडथळे
आज तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळेल. आज तुमच्या आवडीचे काम करा. व्यवसायात काही नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदार लोकांना वरिष्ठांपासून सावध राहावे लागेल. पदोन्नतीच्या मार्गात अडथळे येतील.
आज भाग्य ७५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना जेवू घाला.
कर्क – आळस सोडवा
आज तुम्ही परोपकारासाठी काही पैसे खर्च कराल. ऑफिसमधील वातावरण तुमच्या विचारांनुसार असेल. तुमच्या सुचनांचे पालन केले जाईल. पार्टीला जाऊ शकता. शत्रूंपासून सावध राहा. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला आळस सोडावा लागेल. मुलांकडून चांगल्या बातम्या ऐकू येतील.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर चंदनाचा टिळा लावा.
सिंह – पैसे खर्च होतील
आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असेल. तुमचे लक्ष अध्यात्माकडे अधिक राहिल. तुमच्या मनाला शांती मिळेल. इतरांना मदत कराल. जपून काम करा. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमची प्रशंसा करतील.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घ्या.
कन्या – कामात घाई नको
आज कोणत्याही कामात घाई करु नका. घाईमुळे तुमचे काम बिघडू शकते. कुटुंबातील सदस्यांशी वाद झाला असेल तर तो मिटेल. नात्यात दरी निर्माण होऊ शकते. कुटुंबात मुलांशी बोलण्यात वेळ घालवाल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना मदत करा.
तुळ – आर्थिक लाभ होईल
आज कोणतेही नवीन काम सुरु केले तर त्यातून आर्थिक लाभ मिळेल. मालमत्तेशी संबंधित वाद सुरु असेल तर त्यात यश मिळेल. कुटुंबातील सदस्य पार्टीचे आयोजन करतील. शत्रू तुमच्यासाठी समस्या निर्माण करतील. कामावर लक्ष केंद्रित करा.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा.
वृश्चिक – वाहन जपून चालवा
आज व्यवसायासाठी कर्ज घ्याल. कुटुंबातील कलह संपेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. मुलांच्या शिक्षणासाठी प्रवास करावा लागेल. सावधगिरीन पुढे जा. वाहन जपून चालवा. समस्या उद्भवू शकतात.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा.
धनु – विश्वासघात होईल
व्यवसायात कोणावरही विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा. मित्राच्या रुपात शत्रू तयार होतील. तुम्हाला सावध राहावे लागणार आहे. मेहनतीचे अनुकूल परिणाम मिळतील. तुम्ही आनंदी असाल. पैशांची काही व्यवस्था करावी लागेल. व्यवसायात नवीन संधी मिळतील.
आज भाग्य ८४ टक्के तुमच्या बाजूने आहे. पांढरे रेशमी वस्त्र दान करा.
मकर – लग्नातील अडथळे दूर
आज पार्टनरशीपमध्ये व्यवसाय केल्यास चांगला नफा मिळेल. दैनंदिन खर्च भागवण्यात यशस्वी व्हाल. मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होतील. नोकरदार लोकांच्या कामात चिंता वाढू शकते. काम करताना घाई करु नका.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.
कुंभ – आरोग्य बिघडेल
आजचा दिवस प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. आरोग्यापासून व्यवसायापर्यंत सर्व कामे काळजीपूर्वक करावे लागतील. आरोग्य बिघडू शकते. खाण्याच्या सवयींमध्ये निष्काळजी राहू नका. नवीन काम सुरु केले असेल तर भावाचा सल्ला घ्या. व्यवसायात नफा मिळेल.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा.
मीन – काम बिघडेल
आज व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदेशीर परिणाम मिळतील. तुमची सर्व कामे बुद्धीने कराल. इतरांचा सल्ला घेऊ नका. तुमचे काम बिघडू शकते. मित्राच्या मदतीने पुढे याल. पालकांसोबत भविष्याबद्दल चर्चा कराल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा.