Pushpa 2 Vs Baby John Box Office Collection: ‘पुष्पा २’ आणि ‘बेबी जॉन’मध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. वरुण धवनच्या या सिनेमाने मात्र बॉक्स ऑफिसची सपशेल निराशा केली आहे.
हायलाइट्स:
- ‘पुष्पा २’ची कमाई थांबता थांबेना
- ‘बेबी जॉन’ला मात्र दिवसाला १ कोटी कमावणंही कठीण
- बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुन अव्वल
Pushpa 2 रीलिज होऊन ३१ दिवस झाले, तरी अवघ्या काहीच दिवसांपूर्वी रीलिज झालेल्या ‘बेबी जॉन’ला या सिनेमाने धूळ चारली आहे. वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ गेल्यावर्षी ख्रिसमसला प्रदर्शित झाला. ‘थेरी’ या दाक्षिणात्य सिनेमाचा रीमेक असणारा ‘बेबी जॉन’ बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यात सपशेल नापास ठरला आहे. एकीकडे पाचव्या शनिवारी ‘पुष्पा २’ने ५.५ कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसरीकडे रीलिजनंतरच्या दुसऱ्या शनिवारी ‘बेबी जॉन’ने १ कोटी रुपयेदेखील कमावले नाहीत. त्यामुळे हा मल्टिस्टारर सिनेमा ४० कोटींचा आकडा गाठेल की नाही, अशी शंका आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या शनिवारी ‘बेबी जॉन’ने केवळ ८० लाख रुपयांची कमाई केली आहे. ओपनिंग डेला या चित्रपटाने ११.२५ कोटी कमावले होते, तेव्हा या चित्रपटाडून अपेक्षा होत्या. मात्र आता व्यवसाय वाढेल याची शक्यता कमीच आहे. एकूण ११ दिवसात या चित्रपटाने केवळ ३७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पुष्पा २’च्या कमाईसमोर हे आकडे जवळपासही नाहीत, असे चित्र आहे.