आजचे राशिभविष्य, ७ जानेवारी २०२५ : तुळसह ४ राशींना कुटुंबाची चिंता सतावेल! फसवणूक होईल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Today Horoscope 7 january in Marathi, आजचे राशीभविष्य:  आज मंगळवार ७ जानेवारी रोजी चंद्र मेष राशीत जाणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी शिवयोग, सिद्धयोग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याने त्याचा लाभ होईल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Aaj che Rashi Bhavishya 7 january 2025 :
आज मंगळवार ७ जानेवारी रोजी चंद्र मेष राशीत जाणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी शिवयोग, सिद्धयोग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याने त्याचा लाभ होईल. परदेशात शिक्षणाच्या संधी मिळतील. नोकरीच्या दिशेने प्रयत्न केल्यास यश मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळतील. गरजूला मदत केल्याने तुम्हाला फायदा होईल. कौटुंबिक समस्येशी झुंजत असाल तर उपाय शोधा. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – पैसे अडकतील

आज तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत असाल तर सल्ला घ्या. कुठेतरी गुंतवणूक केल्याने पैसे अडकू शकतात. परदेशात शिक्षणाच्या संधी मिळतील. नोकरीच्या दिशेने प्रयत्न केल्यास यश मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळतील.
आज भाग्य ९४ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा.

वृषभ – संपत्ती मिळेल

आज तुम्हाला अचानक संपत्ती मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. गरजूला मदत केल्याने तुम्हाला फायदा होईल. कौटुंबिक समस्येशी झुंजत असाल तर उपाय शोधा.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या.

मिथुन – भीती सतावेल

आज तुमच्या मनात विचित्र भीती निर्माण होईल. तुमचे विचार एखाद्या मित्रासोबत शेअर कराल. ज्याचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आर्थिक स्थितीला गती मिळेल. कोणाचे मन दुखावू नका.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा.

कर्क – पोटदुखी सतावेल

आज पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देतील. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. कोणाच्या तरी प्रभावाखाली निर्णय घेणे टाळा. अन्यथा समस्या येतील. जमिनीशी संबंधित कोणताही वादाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा.

सिंह – प्रगतीत अडथळे

आज तुमचे काम प्रगती आणि उत्साहाने कराल. प्रगतीमधील अडथळे दूर होतील. तुमचा आनंद द्विगुणित होईल. तुमचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. अहंकाराची भावना मनात आणू नका. व्यस्त जीवनशैलीमुळे कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही.
आज भाग्य ७५ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा

कन्या – नुकसान होईल

आज तुमच्या शत्रूंमुळे मोठे नुकसान होईल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे कमवाल. तुमचे शत्रू अस्वस्थ होतील. आई-वडिलांचा सल्ला घेऊन मगच कृती करा.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरी वस्तू दान करा.

तुळ – चिंता सतावेल

आज तुमच्या चिंतेमुळे आनंद नष्ट होईल. तुम्हाला हुशारीने वागावे लागेल. जोडीदारासोबत वाद होतील. आज कामात निराशा येऊ शकते. मोठ्यांचा सल्ला घ्या. तुमचे मन अस्वस्थ राहिल.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाला खडीसाखर-लोणी अर्पण करा.

वृश्चिक – डोळ्यांच्या समस्या वाढतील

आज व्यवसायात एकामागून एक कामे होतील. तुम्ही चिंतेत सापडाल. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबासाठी वेळ मिळणार नाही. वडिलांच्या डोळ्यांशी संबंधित समस्या वाढतील.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला चपाती खाऊ घाला.

धनु – सावध राहा

आज व्यवसायात डील फायनल करण्यासाठी उत्साही असाल. घाईघाईने केलेले काम खराब करु नका. कोणाच्या फसवणुकीत पडू नका. तुम्हाला सावध राहावे लागेल. कुटुंबातील सदस्यामुळे दिवस थोडा त्रासदायक ठरेल. भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित करा. नोकरीच्या नवीन संधी मिळतील.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा.

मकर- नफा मिळेल.

आज तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायासाठी काही योजनांवर लक्ष केंद्रित कराल. तुम्हाला मोठा नफा मिळू शकते. घाईने कोणताही निर्णय घेणे टाळा.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना तांदूळ दान करा.

कुंभ – आर्थिक स्थिती विसकटेल

आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. कोणतेही काम पूर्ण होऊ शकते. जोडीदारासोबत नाराजीचे सुरु असतील. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील. उत्पन्न आणि खर्चात समतोल राखावा लागेल. तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होईल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा.

मीन – प्रगती होईल

आज जोडीदाराची प्रगती पाहून आनंद होईल. लग्नाबाबत काही समस्या असतील त्या सुटतील. नोकरदार लोक दुसरी नोकरी शोधत असाल तर काही काळ विचार पुढे ढकला. जवळच्या कोणत्याही व्यक्तीशी व्यवहार करणे टाळा.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस.आणखी वाचा

Source link

Aajche Rashi Bhavishya 7 januarydaily rashi bhavishya 7 januaryHoroscope Today 7 january In marathimaharashtra times rashi bhavishya todaytoday rashi bhavishya 7 januaryमंगळवारचे राशीभविष्य
Comments (0)
Add Comment