Today Horoscope 8 january in Marathi, आजचे राशीभविष्य: आज बुधवार ८ जानेवारी रोजी चंद्र मेष राशीत असणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची नववी तिथी असून या दिवशी सिद्ध योग, साध्ययोग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ४ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा आहे.
आज बुधवार ८ जानेवारी रोजी चंद्र मेष राशीत असणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची नववी तिथी असून या दिवशी सिद्ध योग, साध्ययोग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ४ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये गोडवा येईल. मित्रांसोबत फिरायला जाल. सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना मान-सन्मान मिळेल. सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील. अडकलेले पैसे मिळतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – वाद होतील
आज सरकारी कामात अधिकाऱ्यांशी वाद होतील. गुंतवणूक करण्याचा विचार केला असेल तर पुढे ढकला. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये गोडवा येईल. मित्रांसोबत फिरायला जाल. सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना मान-सन्मान मिळेल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
वृषभ – चिंता सतावेल
आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना अनावश्यक खर्चांपासून सावध राहावे लागेल. आर्थिक परिस्थितीची चिंता सतावेल. सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील. अडकलेले पैसे मिळतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहिल.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा.
मिथुन – नफा मिळेल.
आज व्यवसायाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देतील. वडिलांच्या मदतीने त्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही काही छोटे व्यवसाय कराल. मित्रांसोबत वेळ घालवाल. व्यवसायतून नफा मिळेल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.
कर्क – संवाद वाढवा
आज सामाजिक क्षेत्रातील लोकांशी तुमचा संवाद वाढेल, ज्यामुळे फायदा होईल. तुम्हाला विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही. तुमच्यासाठी समस्या निर्माण होतील. नातेवाईकांना तुमच्या लग्नाची काळजी वाटेल.
आज भाग्य ९७ टक्के तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा.
सिंह – कठोर परिश्रम करा
आज कठोर परिश्रम केल्यावरच यश मिळेल. तुम्हाला काही खर्चांना सामोरे जावे लागेल. तुम्ही थोडे चिंतेत असाल. व्यवसायात फायद्याच्या नवीन संधी मिळतील. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदारासोबत महत्त्वाच्या मुदद्यांवर चर्चा कराल.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या
कन्या – अडकलेले पैसे मिळतील
आज शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबात काही समस्या असतील तर त्याचे निराकरण कराल. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा घरात रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा.
तुळ – व्यवसायात प्रगती
आज व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रवास कराल. परदेशी व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली माहिती मिळेल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असेल तर काही काळासाठी पुढे ढकलाल. व्यवसायाची प्रगती पाहून उत्साही असाल. वरिष्ठांचा सल्ला घ्या.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिवळी वस्तू दान करा.
वृश्चिक – चिंता वाढेल.
आजचा दिवस तुम्ही काही खास कामात घालवाल. नोकरदार लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याची आवश्यकता भासेल. आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा काम वेळेवर पूर्ण होणार नाही. तुमची चिंता वाढेल.
आज भाग्य ६८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा खाऊ घाला.
धनु – पालकांची सेवा कराल
आज तुम्ही कामात विचलित व्हाल. विनाकारण काही गोष्टींबद्दल चिंता वाढेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला विवाहाशी संबंधित समस्या असतील तर वरिष्ठांशी बोला. संध्याकाळाचा वेळ पालकांची सेवा करण्यात घालवाल. जोडीदाराची साथ मिळेल.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडावर दूध मिश्रित पाणी अर्पण करा.
मकर – आरोग्याची काळजी घ्या
आज प्रॉपर्टीची डील फायदेशीर ठरेल. कोणाच्याही प्रभावाखाली निर्णय घेऊ नका. तुमचे नुकसान होऊ शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आरोग्य कमकुवत असेल. संध्याकाळचा वेळ मुलांसोबत घालवाल.
आज भाग्य ७३ टक्के तुमच्या बाजूने असेल. माशांना पिठांचे गोळे खाऊ घाला.
कुंभ – पैसे खर्च होतील
आज जुने कर्ज फेडण्यात यशस्वी व्हा. जोडीदारासोबत खरेदीला जाल. तुमचे पैसे खर्च होतील. व्यस्त वेळापत्रकात स्वत:साठी वेळ काढू शकणार नाही. सरकारी नोकरीशी संबंधित प्रमोशन मिळेल.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुची आराधना करा.
मीन – कामात यश
आज कोणत्याही कामात यश मिळेल. आज तुमच्या आवडीचे काम कराल. मित्राच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल. समस्येचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज केा असेल तर कठोर परिश्रम केल्यानंतरच यश मिळेल.
आज भाग्य ८५ टक्के तुमच्या बाजूने असेल. हनुमानाला शेंदूर अर्पण करा.