Mars Retrograde Transit Gemini : ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिन्यात मंगळाचे मिथुन राशीत संक्रमण होणार आहे. या काळात मंगळ वक्री होऊन मिथुन राशीत प्रवेश करेल. मंगळ हा ग्रह शौर्य, धैर्य, शक्ती आणि उर्जेसाठी जबाबदार ग्रह मानला जातो. जाणून घेऊया मंगळाचे संक्रमण कोणत्या राशीसाठी धोकादायक ठरणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिन्यात मंगळाचे मिथुन राशीत संक्रमण होणार आहे. या काळात मंगळ वक्री होऊन मिथुन राशीत प्रवेश करेल. मंगळ हा ग्रह शौर्य, धैर्य, शक्ती आणि उर्जेसाठी जबाबदार ग्रह मानला जातो.
मंगळ हा ग्रह २१ जानेवारीला मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याच्या संक्रमणामुळे ४ राशींवर संकट येईल. आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. व्यवसायात नकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. करिअर क्षेत्रात भीती निर्माण होईल. जाणून घेऊया मंगळाचे संक्रमण कोणत्या राशीसाठी धोकादायक ठरणार आहे.
मिथुन राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव
मिथुन राशीत मंगळाचे संक्रमण अडचणीचे ठरणार आहे. या काळात तुम्हाला विवेकबुद्धीने वागावे लागेल. तुम्हाला व्यावसायिकदृष्टिकोनातून निर्णय घ्यावे लागतील. वैयक्तिक आयुष्य विस्कळीत होऊ शकते. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जाल.
कर्क राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव
मंगळाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांच्या व्यावसायिक जीवनावर अधिक परिणाम करु शकते. यश मिळविण्यासाठी नोकरीत कठोर परिश्रम करावे लागतील. या काळात आर्थिक स्थिती चांगली असली तरी खर्च वाढेल. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरु शकता. जीवनसाथीकडून तुम्हाला मिळणारे प्रेम अपेक्षित आनंद देणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ थोडा कमकुवत असेल. पचनाशी संबंधित समस्या येतील.
वृश्चिक राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव
मंगळाचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अडथळ्यांचे ठरणार आहे. या काळात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. प्रवासातून काही प्रमाणात फायदा होईल. नोकरीत बदल होतील जे तुम्हाला आवडणार नाही. तुमची उद्दिष्टे साध्य करण्यात अयशस्वी व्हाल. तणाव निर्माण होईल.
धनु राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव
मंगळाचे संक्रमण धनु राशीच्या लोकांना तणावाचा सामना करावा लागू शकतो. पालकांना मुलांबद्दल काळजी वाटू शकते. करिअरच्या बाबतीत सहकाऱ्यांसोबतच्या नात्यात अडचणी येतील. कामात कमी समाधानी राहतील. व्यवसायात कमी नफा मिळेल. तुम्हाला या काळात नशीबावर अवलंबून राहावे लागेल.जोडीदाराच्या तब्येतीवर पैसे खर्च करावा लागेल.