Makar Sankranti 2025 Grah Sankraman : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत जाईल. मकर संक्रांतीला शनि देव त्यांच्या मुळ राशीत अर्थात कुंभ राशीत असणार आहे. हा योग तब्बल ३० वर्षानंतर जुळून आला आहे. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला तुळसह सूर्य-शनिची कृपा राहिल. जाणून घेऊया कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल.
जानेवारी महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा करतात. मकर संक्रांतीनंतर लग्न, मुंडन आणि इतर शुभ कार्याला सुरुवात होते.
यंदाच्या मकर संक्रांतीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. तब्बल ३० वर्षानंतर मकर संक्रांतीला दुर्मिळ संयोग घडत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत जाईल. मकर संक्रांतीला शनि देव त्यांच्या मुळ राशीत अर्थात कुंभ राशीत असणार आहे. हा योग तब्बल ३० वर्षानंतर जुळून आला आहे. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला तुळसह सूर्य-शनिची कृपा राहिल. जाणून घेऊया कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल.
मिथुन राशीवर शनिदेवाचा प्रभाव
मिथुन राशीच्या लोकांना या काळात शनिदेवाची कृपा राहिल. शनि भाग्य स्थानात असल्यामुळे हा काळ अनुकूल असेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. खर्चात वाढ होईल. संपत्तीच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी संपतील. नोकरदार लोकांना आनंदाची बातमी मिळेल. नवीन नोकरीच्या संधी मिळतील.
तुळ राशीवर शनिदेवाचा प्रभाव
तुळ राशीच्या लोकांना या काळात परदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल. शिक्षण आणि व्यवसायानिमित्त प्रवास कराल. इच्छुकांचे लग्न जमू शकते. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. धातुशी संबंधित काम करणाऱ्यांना फायदा होईल. बांधकाम कार्यात लाभ होऊ शकतो. धार्मिक कार्यात रुची वाढेल. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. प्रभावशाली लोकांशी भेट होईल.
मकर राशीवर शनिदेवाचा प्रभाव
मकर राशीच्या लोकांना शनिच्या साडेसातीपासून आराम मिळेल. तुमच्या अनेक समस्या दूर होतील. मकर राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल. जुन्या कर्जातून सुटका मिळेल. व्यावसायिकांना विशेष लाभ होईल. आई-वडिलांचे आशीर्वाद मिळेल.
कुंभ राशीवर शनिदेवाचा प्रभाव
कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा तिसरे चरण सुरु राहील. करिअरमधील अडचणी दूर होतील. राहूचा देखील प्रवेश कुंभ राशीत होणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना फायदा होईल. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. सूर्य-शनिच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी चांगले दिवस येतील. मालमत्ता खरेदीसाठी चांगल्या संधी मिळतील. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.