Weekly Numerology Prediction 13 January To 19 January 2025 : मूलांक 1 साठी आठवडा उत्तम असून मधुर संवादाने संकटावर मात कराल. मूलांक 2 चे लवलाइफ उत्तम आणि सुखसमृद्धीचा योग आहेत. मूलांक 4 साठी प्रोजेक्टची कामे मार्गी लागतील मूलांक 6 च्या जातकांना थोडे टेन्शन असेल त्यामुळे झोपेवर परिणाम होईल. मूलांक 8 च्या लोकांनी आत्मविश्वासाने काम करा, यश मिळेल तर मूलांक 9 साठी धनलाभाचे योग आहेत. चला, पाहूया 2025 या आठवड्यात तुमचा मूलाकं काय सांगतो? मूलांक 1 ते मूलांक 9 साठी आठवडा कसा असेल ते पाहूया.
मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): मधुर संवादाने संकटावर मात करा
कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि मान-सन्मानही वाढेल. या आठवड्यात प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात. आर्थिक बाबतीत मधुर संवादाने परिस्थिती हाताळायला हवी. प्रेम संबंधात मन भावुक राहील. या आठवड्याच्या शेवटी परिस्थिती हळूहळू तुमच्यासाठी अनुकूल होईल.
मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): लवलाइफ उत्तम, सुखसमृद्धीचा योग
आठवड्याची सुरुवात ठिक आहे तसेत लवलाइफ उत्तम असेल. प्रेम जीवनात एक नवीन सुरुवात सुख-समृद्धीच्या योग तयार करेल. कार्य क्षेत्रातील नेटवर्किंगमुळे शुभ परिणाम मिळतील. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असून धनलाभाचे योग आहेत. आठवड्याच्या शेवटी, बेफिकीर वागणे कमी करा म्हणजे चांगले अनुभव मिळतील.
मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): मानसिक समाधान, धनलाभाचे योग
आठवड्याची सुरुवात चांगली असेल. प्रेम संबंधात एकमेकांमध्ये प्रेम वाढेल आणि लव्ह लाइफ रोमँटिक असेल. तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आर्थिक बाबतीत धन वृद्धीचे योग आहेत. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टमुळे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती अनुकूल असून भविष्यासाठी योजना बनवण्याची प्रेरणा मिळेल.
मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): प्रोजेक्टची कामे मार्गी लागतील
कार्यक्षेत्रात प्रगती असून मान-सन्मानही वाढेल. प्रोजेक्टची कामे मार्गी लागल्यामुळे रिलॅक्स फिल करणार आहात. प्रेम संबंधात एक नवीन सुरुवात सुख-समृद्धीचे शुभ संयोग तयार करेल. आर्थिक बाबतीत आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घेतल्यास, गुंतवणुकीतून लाभ होईल. या आठवड्याच्या शेवटी परिस्थिती अनुकूल असून मन प्रसन्न राहील.
मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): खर्च जास्त, गुंतवणुकिकडे लक्ष द्या
कार्यक्षेत्रात प्रगती असून या आठवड्यात तुमच्या त्वरित निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे यश मिळेल. आर्थिक बाबतीत खर्च जास्त होऊ शकतात त्याचवेळी गुंतवणुकीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रेम संबंधात वेळ रोमँटिक असेल. आठवड्याच्या शेवटी, एखाद्या गोष्टीमुळे मन अशांत होऊ शकते, पण सकारात्मक विचार करा किंवा योग, ध्यान धारणा करा.
मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): टेन्शनमुळे झोपेवर परिणाम
कार्यक्षेत्रात जुने प्रोजेक्ट पुन्हा सुरू होऊ शकतात आणि ते यशाच्या मार्गाने पुढे जातील. या आठवड्यात आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि धनलाभाचे योग आहेत. प्रेम संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. काही टेन्शनमुळे झोप कमी होवू शकते. या आठवड्याच्या शेवटी तुम्ही अधिक व्यस्त राहणार आहात.
मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): धनलाभाचे योग
कार्यक्षेत्रात आरामदायक स्थिती असून प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार आहेत. आर्थिक बाबतीत धनलाभाचे योग असून आठवड्याच्या सुरुवातीलाच चांगली बातमी मिळेल. प्रेम संबंधात एखाद्या गोष्टीमुळे मन अशांत होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी, मंगल कार्यक्रमात सहभागी होणार आहात, त्यामुळे मन प्रसन्न राहील.
मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): आत्मविश्वासाने काम करा, यश मिळणार
या आठवड्यात लवलाइफ चांगली असेल. कार्यक्षेत्रात स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घेतल्यास प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. आर्थिक बाबतीत थोडी अडचण आहे तेव्हा सतर्क राहा. कुटुंबासोबत संबंध अधिक दृढ होतील. आठवड्याच्या शेवटी, मन भावुक असेल आणि थोडं टेन्शन वाढलेलं असेल.
मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): धनलाभाचे योग
लव्ह लाइफमध्ये नवीन विचारांसोबत पुढे जाणार आहात. आर्थिक बाबतीत हा आठवडा शुभ राहील आणि धनलाभाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात एखाद्या प्रोजेक्टमुळे नुकसान होऊ शकते पण तुम्ही धैर्याने लढा द्याल. आठवड्याच्या उत्तरार्धात, मन भावुक राहील आणि काही गोष्टींबद्दल निराशा वाटू लागेल. सकारात्मक विचार करा.