Numerology Prediction, 12 January 2025 : मूलांक 1 चे जातक कुटुंबाला उत्तम वेळ देणार, तर मूलांक 2 च्या लोकांनी वादविवादापासून स्वतःला दूर ठेवा. मूलांक 4 साठी निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. मूलांक 6 ला इच्छेनुसार कामाची संधी मिळेल तर मूलांक 7 साठी मेहनत जास्त आहे. मूलांक 9 च्या लोकांचा गैरसमजामुळे मतभेद होईल. चला तर पाहूया मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – कुटुंबाला उत्तम वेळ देणार
आजचा दिवस ठिक असून कुटुंबातील सदस्यांसोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळेल. पण आज काही कारणामुळे मन द्विधा मनस्थीतीत असेल. जोडीदारासोबत भांडण होण्याची शक्यता आहे, तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा, अपशब्द वापरलेत तर नात्यांवर परिणाम होवू शकतो.
मूलांक 2 – वादविवादात फसू नका
आज आईकडून काही गोष्टी ऐकायला मिळू शकतात. कोणत्याही प्रकारच्या वादविवादात फसू नका. रागावर आणि वाणीवर नियंत्रण हवे. कुटुंबात थोडा ताणतणाव असेल पण संध्याकाळपर्यंत वातावरण ठिक होईल. तुमच्या स्वभावात खूप चीडचीड असणार आहे. कोणाशीही बोलताना अपशब्द वापरु नका, सभ्य भाषेचा वापर करा
मूलांक 3 – कार्यक्षेत्रात लाभाची संधी
काही गोष्टींमुळे राग वाढण्याची शक्यता आहे. रागाचा पारा चढू देवू नका अन्यथा तुम्हाला त्रास होवू शकतो. संयमाने वागणे आज फार महत्त्वाचे आहे. कोणाशीही कठोर शब्दात बोलू नका. तब्येतीची विशेष काळजी घ्या. रखडलेले पेमेंट आज मिळेल तसेच कार्यक्षेत्रात लाभाची संधी आहे
मूलांक 4 – निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता
प्रवासाचा योग आहे पण काळजी घ्यावी लागेल. सर्व गोष्टींचा विचार करूनच प्रवासाला सुरुवात करा. निष्काळजीपणामुळे काही गोष्टींचा हानी होऊ शकते. प्रत्येक कामात सतर्क राहा. आज थोडे संयमाने काम करा कारण आज तुमचे नियोजित काम पूर्ण होणार नाही. मुलांच्या आरोग्याबद्दल टेन्शन येणार आहे, परंतु जर तुम्ही संयमाने वागलात तर तुम्हाला त्रास कमी होईल.
मूलांक 5 – नवीन प्रोजेक्ट्सची संधी मिळेल
व्यवसायिक लाभासाठी आपल्याला एखाद्या मित्राकडून नवीन प्रोजेक्ट्सची संधी मिळू शकते. प्रवास लाभदायक आहे. कुटुंबासंदर्भात तुम्हाला खूप शांत राहावे लागेल, कोणतेही काम करण्यापूर्वी तुमच्या सद्सद् विवेक बुद्धीचा वापर करा. जोडीदारासोबत नाते वृद्धीगत होईल.
मूलांक 6 – इच्छेनुसार कामाची संधी मिळेल
दिवस उत्तम असून तुमच्या इच्छेनुसार काही कामांची संधी मिळेल. तुमच्या काही भेटी होतील आणि त्यामुळे आर्थिक प्रगतीचे द्वार खुले होईल. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी घरगुती समस्यांबाबत वाद होऊ शकतात. घरातील वातावरण खेळीमेळीचे आणि समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करा.
मूलांक 7 – मेहनत जास्त, सहकारी मदत करतील
आज काम भरपूर आहे तसेच मेहनत दुप्पट होणार आहे. सहकारी प्रत्येक कामात मदत करतील, तुम्ही चांगल्या प्रकारे वागणूक ठेवा. पैशांच्या बाबतीत वेळ चांगली असून आर्थिक स्थिती उत्तम असेल. आध्यात्मीक गोष्टीत तुम्ही रूची घेणार आहात. घरात एखाद्या धार्मिक कार्याबद्दल चर्चा करु शकता. तुमचे आरोग्य उत्तम असणार आहे फक्त जंक फूड खाणे कमी करा.
मूलांक 8 – खर्च वाढतोय, बचतीकडे लक्ष द्या
तुमचा खर्च जास्त होतो आहे. भविष्यासाठी बचत करुन ठेवा, अधिक खर्चापासून स्वतःला वाचवणे गरजेचे आहे. व्यवसायाच्या नवीन विकासाच्या संधी थोड्या लांब आहेत पण तुम्ही निराश होवू नका. घरात वातावरण ठिक असेल. कुटुंबातील सगळेजण तुम्हाला मदत करतील.
मूलांक 9 – गैरसमजामुळे मतभेदाची शक्यता
आज मतभेदाचा सामना होण्याची शक्यता आहे. कोणत्याही जवळच्या व्यक्तीमुळे गैरसमजामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. जुने आजार डोके वर काढतील, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या. स्वतःला वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे.