Weekly Horoscope 13 to 19 January 2025 : या आठवड्यात सूर्याचे मकर राशीत संक्रमण होणार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल. तसेच गुरु आणि सूर्य एकाच राशीत असल्यामुळे नवपंचम योग तयार होईल. या आठवड्यात बुधादित्य योग देखील तयार होत आहे. त्यामुळे धनुसह ४ राशींसाठी हा काळ चांगला राहिल. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
या आठवड्यात सूर्याचे मकर राशीत संक्रमण होणार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल. तसेच गुरु आणि सूर्य एकाच राशीत असल्यामुळे नवपंचम योग तयार होईल. या आठवड्यात बुधादित्य योग देखील तयार होत आहे. त्यामुळे धनुसह ४ राशींसाठी हा काळ चांगला राहिल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकते. पूर्वी केलेल्या काही विशेष कामातून तुमचा सन्मान होईल. सरकारशी संबंधित लोकांशी जवळीक वाढेल. मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. प्रेमसंबंधाच्यास दृष्टीने हा आठवडा शुभ राहिल. कौटुंबिक सदस्य तुमच्या प्रेमाचा स्वीकार करतील. लग्नासाठी ग्रीन सिग्नल मिळेल. पार्टनरसोबत फिरायला जाल. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
मेष – अपेक्षित नफा मिळेल
या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना जीवनातील समस्यांपासून सुटका मिळणार आहे. तुमची घरगुती परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न कराल. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकते. पूर्वी केलेल्या काही विशेष कामातून तुमचा सन्मान होईल. सरकारशी संबंधित लोकांशी जवळीक वाढेल. तुम्हाला काही गोष्टींमध्ये फायदा होईल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अनुकूल असेल. जोडीदाराच्या सोबत वेळ घालवाल. विवाहित लोकांचे जीवन आनंदी असेल.
भाग्यशाली अंक : 18
भाग्यशाली रंग : आसमानी
वृषभ – प्रवास घडतील
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ आणि भाग्याचा असणार आहे. कार्यक्षेत्राशी संबंधित शुभ परिणाम दिसतील. बाहेरील लोकांकडून विशेष सहकार्य मिळेल. कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. या काळात तुम्हाला मोठे यश मिळेल. मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. प्रेमसंबंधाच्यास दृष्टीने हा आठवडा शुभ राहिल. कौटुंबिक सदस्य तुमच्या प्रेमाचा स्वीकार करतील. लग्नासाठी ग्रीन सिग्नल मिळेल. पार्टनरसोबत फिरायला जाल.
भाग्यशाली अंक : 10
भाग्यशाली रंग : निळा
मिथुन – आर्थिक स्थिती मजबूत
या आठवड्यात तुम्ही अधिक आनंदी असाल. नोकरदार लोकांची बदलीची इच्छा पूर्ण होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळेल. मालमत्तेशी संबंधित सुरु असलेले वाद संपतील. कोर्टातील निर्णय तुमच्या बाजूने लागेल. या आठवड्यात तुम्ही दुप्पट उत्साहाने काम कराल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. संचित संपत्ती वाढेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. मित्रांसोबत फिरायला जाल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
भाग्यशाली अंक : 5
भाग्यशाली रंग : लाल
कर्क – कामात अडथळे येतील
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असेल. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचे विचार तुमच्या मनात येतील. तुमच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. कामाच्या ठिकाणी लोकांपासून सावध राहावे लागेल. कामात अडथळा येऊ शकतो. कुटुंबातील सदस्यासोबत काही कारणावरुन वाद होऊ शकतात. प्रवासादरम्यान आरोग्याची आणि सामानाची काळजी घ्या. या काळात पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा, निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते. प्रेमात अडचणी येतील. सामाजिक अपमानाला सामोरे जावे लागू शकते. विवाहित लोकांना जोडीदाराच्या आरोग्याची काळजी असेल.
भाग्यशाली अंक : 6
भाग्यशाली रंग : हिरवा
सिंह – जबाबदाऱ्या मिळतील
हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यशाली असेल. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरदार लोकांना आठवड्याच्या शेवटी काही मोठी जबाबदारी मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना या आठवड्यात मोठे यश मिळेल. लोकांमध्ये विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. दीर्घ कालावधीसाठी केलेल्या मेहनतीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. नोकरदार लोकांना यश संपादन करण्याची संधी मिळेल. कठोर परिश्रम करताना आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंधात हा आठवडा शुभ राहिल.
भाग्यशाली अंक : 8
भाग्यशाली रंग : गुलाबी
कन्या – अडथळे दूर होतील
हा आठवडा तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला सर्व शक्ती एकवटून तुम्हाला ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायातील अनेक इच्छा पूर्ण होतील. घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. उपजीविकेशी संबंधित मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय मोठा करार मिळेल. परदेशात जाण्याची नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होईल. उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील. मालमत्तेशी संबंधित समस्या सोडवाल. व्यवसायाशी संबंधित लोकांना अचानक कुठूनतरी मोठा पैसा मिळेल. बाजारात अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक कराल. प्रेमसंबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
भाग्यशाली अंक : 5
भाग्यशाली रंग : पिवळा
तुळ – कामात व्यस्त असाल
या आठवड्यात तुम्ही व्यस्त असाल. या आठवड्यत नोकरदार लोकांच्या कामाच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला जास्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. तुमच्या आरोग्य कामात अडथळे निर्माण करतील. आपल्या बुद्धिमत्तेने आणि शहाणपणाने सर्व आव्हानांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. व्यावसायिक लोकांना बाजारात त्यांची प्रतिष्ठा टिकवून ठेवतील. कौटुंबिक समस्येवर तोडगा काढाल. या आठवड्यात तुम्ही कठोर परिश्रम करुन भाग्य साध्य करण्यात यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अनुकूल असेल. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाण्याची संधी मिळेल.
भाग्यशाली अंक : 12
भाग्यशाली रंग : काळा
वृश्चिक – उत्पन्नाचे स्त्रोत वाढेल
हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. आयुष्याशी संबंझित अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. कोणताही जुना वाद किंवा न्यायालयाशी संबंधित प्रकरणातून सुटाल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. तुमच्या संचित संपत्तीत वाढ होईल. कामात यश आणि व्यवसायात आर्थिक लाभामुळे उत्साही असाल. तुम्हाला मोठा करार मिळेल. करिअर आणि बिझनेसमधील तुमचे प्रयत्न प्रगतीचे प्रमुख कारण बनतील. मन धार्मिक -सामजिक कार्यात व्यस्त असाल. अचानक तीर्थयात्रेची योजना बनवाल. प्रेमसंबंधात अनुकूलता राहिल. जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळेल.
भाग्यशाली अंक : 1
भाग्यशाली रंग : पांढरा
धनु – जबाबदाऱ्या वाढतील
या आठवड्यात नशिब तुमचे दार ठोठावेल. आळस आणि अहंकार सोडावा लागेल. पुढे जाण्याच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी जबाबदारी मिळेल. विरोधकांपासून सावध राहा. कोणतेही काम दुसऱ्यावर सोपवण्याची चूक करु नका. अन्यथा काम बिघडू शकते. मुलांशी संबंधित कोणतीही कामगिरी तुमचा आदर वाढवले. या काळात मोठ्या व्यक्तिमत्त्वाला भेटण्याची संधी मिळेल. भविष्यात काही फायदेशीर गोष्टीत सामील होण्याची संधी मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ असणार आहे. तुम्हाला अपेक्षित लाभ मिळतील. जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
भाग्यशाली अंक : 7
भाग्यशाली रंग : सोनेरी
मकर – आरोग्याची काळजी घ्या
या आठवड्याच आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा कामात अडथळे येतील. काही जुने शारीरिक आणि मानसिक आजार डोकं वर काढतील. आरोग्यासोबत तुम्हाला नातेसंबंधांकडे लक्ष द्यावे लागेल. कामातील व्यस्ततेमुळे कुटुंबापासून दूर जाल. दैनंदिन दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी लागेल. व्यवसायिकांना चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. या काळात कोणत्याही नवीन योजनेत पैसे गुंतवताना सावध राहा. अन्यथा मोठे नुकसान होईल. प्रेमसंबंधांमध्ये सावधिगिरीने पुढे जा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. सुखी वैवाहिक जीवनासाठी जोडीदारासाठी वेळ काढा.
भाग्यशाली अंक : 15
भाग्यशाली रंग : तपकिरी
कुंभ – पैसे खर्च होतील
या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात सुरु असलेल्या समस्या कमी होतील. मित्रांच्या मदतीने तुम्ही सर्व अपूर्ण कामे पूर्ण करु शकाल. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायाला नवीन दिशा देण्याची योजना कराल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. लांबचा प्रवास घडेल. घरावर थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील तयार होतील. पैशाची आवक सुरु राहिल. कामाच्या ठिकाणी अचानक जबाबदारी मिळेल. जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणे फायदेशीर ठरेल. प्रेम संबंध सामान्य राहील. जोडीदाराची साथ मिळेल.
भाग्यशाली अंक : 9
भाग्यशाली रंग : राखाडी
मीन – फायदा होईल
हा आठवडा तुमच्यासाठी अधिक शुभ असणार आहे. तुमच्या क्षमतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर कराल. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेऊ शकाल. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. व्यवसायाशी निगडिल लोकांना चांगले व्यवहार मिळतील. बाजारात अचानक वाढ झाल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. नातेवाईकांसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहिल. मैत्राचे रुपातंर प्रेमात होईल. वैवाहिक जीवनात आनंदी राहाल.
भाग्यशाली अंक : 11
भाग्यशाली रंग : जांभळा