Makar Sankranti 2025 Auspicious Yog : यंदा मकर संक्रांतीला अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी धन योग, सूर्य आणि गुरुचा नवपंचम योग आणि शश राजयोग तयार होतो आहे. यामुळे मकर संक्रांतीला तुळ आणि कुंभसह पाच राशींचा भाग्योदय होणार आहे. या राशींसाठी व्यवसायात दुप्पट नफा आणि करिअरमध्ये शानदार यश असेल. चला तर पाहूया त्या लकी राशी कोणत्या आहेत.
मकर संक्रांतीचा मेष राशीवरील प्रभाव
मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे मकर राशीतील संक्रमण अत्यंत शुभ आणि उत्साही वातावरण घेऊन येणार आहे. जन्मकुंडलीत सूर्य मजबूत होणार असून राज योग तयार होतो आहे. तुमच्या जीवनात सकारात्मक सुधारणा तसेच प्रयत्नांना उत्तम यश मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर वेळ उत्तम आहे. व्यावसायिकांसाठी नवे मार्ग खुले होतील. करिअरमध्ये उत्तम संधी येतील.
मकर संक्रांतीचा सिंह राशीवरील प्रभाव
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण सहाव्या स्थानात होत आहे. व्यावसायिंसाठी सूर्याचे मकर राशीतील संक्रमण सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. तुम्ही विरोधकांचा पराभव कराल. तुम्ही कोणत्याही वादात किंवा कायदेशीर समस्यांमध्ये अडकले असाल, तर मार्ग सापडले. जे काही जुने वाद आहेत ते संपुष्टात येतील. प्रगतीचे मार्ग खुले होतील.
मकर संक्रांतीचा धनु राशीवरील प्रभाव
धनु राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे मकर राशीतील संक्रमण शुभ लाभ देणारे आहे. तुमच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव सगळ्यांवर पडेल. तुम्हाला व्यवसायात दुप्पट लाभ होणार आहे तसेच नवीन डिल फायनल होईल. घरातील प्रत्येक सदस्य तुम्हाला साथ देईल. ऑफिसमध्ये शांत राहून आणि फोकस करून काम करा, तुम्हाला कामात उत्तम यश मिळेल. वरिष्ठांची नाराजी ओढावून घेऊ नका. कामात झालेले नुकसान तुम्हाला त्रास देईल त्यामुळे एकाग्रतेने काम करा. कोणत्याही परिस्थितीत आक्रमक होवू नका.
मकर संक्रांतीचा मकर राशीवरील प्रभाव
मकर राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे संक्रमण प्रथम स्थानात होत असून या कालावधीत तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. प्रत्येकजण तुमच्या कामाचे कौतुक करेल. तुम्ही जे काही कार्य कराल त्याची खास नोंद घेतली जाईल. तुमचे नेतृत्व आणि निर्णय घेण्याचे कौशल्य यामुळे प्रतिष्ठा आणि मान – सन्मान वाढेल. तुम्हाला कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. करिअरसाठी अत्यंत शुभ कालावधी आहे.
मकर संक्रांतीचा कुंभ राशीवरील प्रभाव
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे मकर राशीतील संक्रमण शुभ प्रभाव वाढवणार आहे. करिअरमध्ये उत्तम संधी मिळतील त्याचा लाभ घ्या. तुमच्यासाठी वर्षाची सुरूवात खूपच शानदार असणार आहे. सूर्य आणि शनीचा मकर राशीतील संक्रमण तुमची आर्थिक स्थिती उत्तम ठेवेल कुटुंबातही सुख आणि समाधानाचे वातावरण असेल.