Vastu Tips For Mobile Wallpaper: मोबाइलच्या स्क्रीनवर आपण विविध वॉलपेपर ठेवत असतो. हे वॉलपेपर पाहून मन प्रसन्न होतं, पण तुम्हाला माहित आहे का मोबाइलच्या वॉलपेपरमुळे तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. वास्तुशास्त्रानुसार असे काही वॉलपेपर आहेत जे तुमची प्रगती करतात, ते वॉलपेपर कोणते? जाणून घेऊया.
मेहनतीचे फळ मिळेल
तुम्ही खूप मेहनत करत आहात पण तुम्हाला यश मिळत नाही. तर तुम्ही पायऱ्यांवर चढत जाणारी व्यक्ती असा वॉलपेपर ठेवावा. यामुळे मेहनतीचे फळ मिळेल आणि करिअरमध्ये प्रगतीचे शुभ संयोग तयार होतील. या वॉलपेपरमुळे आर्थिक वृद्धीचे शुभयोग तयार होतील.
मन विचारांचे काहूर होईल दूर
तुमचे कामात मन एकाग्र होत नाही. मनात अनेक विचार येतात, मन सैरभैर होतं आणि काय करावं ते नक्की कळत नाही. कोणत्याही कामात तुमचं लक्ष लागत नाही, अशावेळी तुम्ही मोबाइल किंवा लॅपटॉपवर तुम्ही पाऊसाचे थेंब म्हणजे रिमझीम पाऊसधारा किंवा योग मुद्रा असलेला वॉलपेपर ठेवा. यामुळे तुमचं मन कामात एकाग्र होईल. मनातील विचारांचे काहूर कमी होवून मानसिक समाधान मिळेल.
प्रगतीचे शुभ तयार होतील
तुम्ही एखादा प्रोजेक्ट करत आहात पण ते पूर्ण करताना अडचणी येत आहेत. तुमची प्रगती अगदी कमी प्रमाणात होत आहे. तर तुम्ही मोबाइल किंवा लॅपटॉपवर ‘ब्लेसिंग बुद्धा’चा वॉलपेपर लावणे फायदेशीर ठरेल. या वॉलपेपरमुळे नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील. तुमच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होवून कामात यश मिळेल.
विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील
जर तुमच्या विवाहात कोणत्याही प्रकाराची अडचण येत असेल किंवा विवाह ठरत असेल पण काही कारणामुळे तुटत असेल, तर मोबाइल किंवा लॅपटॉपवर गुलाबाचा वॉलपेपर ठेवा. गुलाबाचा संबंध शुक्र ग्रहासोबत असून दांपत्य जीवनाचा कारक ग्रह अशी शुक्राची ओळख आहे. गुलाबाचा वॉलपेपर ठेवला तर विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होईल आणि लवकर विवाहाचे शुभ योग जुळून येतील.