मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य लॉटरी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र नाताळ भव्यतम सोडत दि. ३ जानेवारी २०२५ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालय सभागृह या ठिकाणी काढण्यात आली. पहिले सामायिक २५ लाख रुपयांचे एक बक्षीस चिराग एन्टरप्रायजेस, नाशिक येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळविले आहे.
या सोडतीमधून जनतेच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी या ब्रीद वाक्याचा पुरेपूर अवलंब करण्यात आला. रक्कम १० हजारच्या आतील रकमेची ७० बक्षिसे व रु. १० हजार वरील रकमेची २ हजार ५८२ बक्षिसे लागली आहेत. एकूण सर्व बक्षिसांची रक्कम ४९ लाख ४ हजार इतकी होती.
सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम 10 हजार रुपयांवरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. 10 हजार रुपयांच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
0000
वंदना थोरात/विसंअ/