Numerology Prediction, 15 January 2025 : आज मूलांक 1 साठी नवीन काम सुरु करण्याची संधी, मूलांक 2 च्या लोकांना गुंतवणुक उत्तम फायदा देणार, मूलांक 3 असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्या. मूलांक 6 चा जास्त खर्च होईल तर मूलांक 9 च्या रागाचा पारा वाढलेला असेल. चला तर पाहूया मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – नवीन काम सुरु करण्याची संधी
मूलांक 1 साठी वेळ चांगली असून तुम्ही जेवढी अपेक्षा केली होती त्यापेक्षा जास्त काम पूर्ण होणार आहे. काही नवीन कामे सुरू करण्याचा संधी मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढणार आहेत. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. सरकारी कामे मार्गी लागतील तसेच घरातील वातावरण चांगेल असेल.
मूलांक 2 – गुंतवणुक उत्तम फायदा देणार
मूलांक 2 साठी वेळ ठिक असून तुम्ही केलेली गुंतवणूक लाभदायक असणार आहे. भावनिक होवून कोणतेही काम करु नका. व्यवसायात वाढ होईल, भविष्यात फायद्याची ठरेल. भावंडांसोबत संबंध अधिक दृढ होतील.
मूलांक 3 – तब्येतीची काळजी घ्या
मूलांक तीन असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. तब्येत अचानक खराब होण्याची शक्यता आहे. कोणत्याही धर्माबद्दल टीका करू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना सखोल विचार करा. घरात वातावरण सकारात्मक असेल.
मूलांक 4 – काम करताना सतर्क राहा
मूलांक 4 साठी दिवस ठिक असून नशिबाची प्रत्येत कार्यात साथ मिळेल. काही गोष्टी मानसिक त्रास देऊ शकतात. व्यवसायात अनावश्यक गुंतवणूक करु नका, भविष्यात तुम्हाला त्रास होईल. काही लोक मोठ्या मोठ्या गोष्टी करून, तुम्हाल गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करु शकतात, कृपया सावध राहा.
मूलांक 5 – व्यवसायात नवीन मार्ग खुले होतील
मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी दिवस ठिक असून व्यवसायात नवीन मार्ग खुले होणार आहेत, त्याचा लाभ घ्या. धन-संपत्तीच्या बाबतीत दिवस ठिक आहे. तुमचे सर्व नियोजित कार्य पूर्ण होईल. धनलाभाचा योग असून मिळकतीचे अनेक मार्ग खुले होतील.
मूलांक 6 – जास्त खर्चामुळे चिडचिड वाढणार
मूलांक 6 साठी दिवस ठिक असून व्यवसायात महिलेच्या मदतीमुळे कामे मार्गी लागतील. अनावश्यक गोष्टींवर जास्त पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे चिडचिड वाढू शकते. घरातील सदस्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये वातावरण ठिक असेल.
मूलांक 7 – हट्टी स्वभाव त्रास देणार
मूलांक 7 असणाऱ्यांसाठी दिवस फारसा ठिक नाही. तुमचा हट्टी स्वभाव तुम्हाला त्रास देणार आहे. ऑफिस किंवा व्यवसायाच्या कामानिमित्त प्रवासाचा योग आहे. कुटुंबाबद्दलचा आदर द्विगुणीत होईल, तसेच घरात जास्त वेळ देण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात वाढ होते आहे, नियोजन, व्यवस्थापन आणि फोकस याकडे लक्ष द्या.
मूलांक 8 – मेहनत करा तरच लाभ मिळेल
मूलांक 8 असलेल्या व्यक्तींना प्रत्येक कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात काही नुकसान होऊ शकते, त्यामुळे आज गुंतवणूक करु नका. कठोर मेहनत केली तरच तुम्हाला यश मिळेल. व्यवसायातही जास्त काम करावे लागेल. तुमची आजची मेहनत भविष्यात मोठा लाभ देणार आहे..
मूलांक 9 – वाणीवर नियंत्रण ठेवा
मूलांक नऊ असलेल्यांसाठी दिवस ठिक आहे पण थोड्या फार प्रमाणात गोंधळाची स्थिती असेल. निरर्थक क्रोध वाढू शकतो. तुमच्या भाषेवर अधिक नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा नुकसान होऊ शकते. कामात अधिक फोकस आणि नियोजन केलं तर भरपूर यश मिळेल.