Pune कोंढव्यातील वाहतूक समस्या कमी झाली कुमार घाडगे पोलीस निरीक्षक

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

Pune Kondhwa: शितल पेट्रोल पंप जवळील अशोका mews सोसाइटी च॓ चौकातून सर्वे नंबर ४२ नवाजिस गल्ली कोंढवा खुर्द गावाकडे जाणारी गल्ली अरुंद असल्याने सदर गल्लीमध्ये वाहतूक कोंडी झाल्यास त्याचा फ्लो अशोका म्युज सोसायटी च॓ चौकामध्ये येऊन अशोका म्युज् चौक जाम होत होता.कुमार घाडगे
पोलीस निरीक्षक
यांनी पाहिले की लोक किती त्रास सहन करत होते.
त्या अनुषंगाने स्थानिक नागरिक ,सामान्य नागरिक व दुकानदार यांच्याशी चर्चा करून अशोका म्युज या चौकातील मध्यभागी असलेले पंक्चर बॅरिकेट व बांबूच्या साह्याने प्रायोगिक तत्त्वावर बंद करून घेतला आहे. त्यामुळे सदर गल्लीकडे जाण्यासाठी अशोका म्युझ चौकापासून 30 मीटर अंतरावरून यू टन घेऊन नागरिक सदर गल्लीत जात आहेत.
तयामुळे अशोका म्युज चौकात होणारी वाहतूक कोंडी तात्पुरत्या स्वरूपात कमी झाल्याचे दिसून येत आहेत.
सदर ठिकाणी वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे स्थानिक नागरिक व दुकानदार समाधान व्यक्त करत आहेत.

कोंढवाच्या लोकांनी त्यांचे आभार मानले

कुमार घाडगे
पोलीस निरीक्षक
कोंढवा वाहतूक विभाग पुणे शहर

Comments (0)
Add Comment