Mercury Transit 2025 in Capricorn :
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचे २४ जानेवारीला मकर राशीत संक्रमण होणार आहे. संध्याकाळी ५ वाजून २६ मिनिटांनी संक्रमण होईल. बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होईल.
वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये बुधादित्य राजयोग हा धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जाणार आहे. तुम्हाला पैसा आणि मानसन्मान मिळेल. मकर राशीत तयार झालेला बुधादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे मेषसह ५ राशींचे भाग्य पलटणार आहे. व्यवसायात भरपूर पैसे कमवण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये नवीन उंची गाठाल. जाणून घेऊया कोणत्या राशी भाग्याशीला ठरतील.

मेष राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
मेष राशीत बुधाचे संक्रमण जीवनात मोठे यश मिळवून देईल. व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे कौतुक होऊ शकते. सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल. राजकारणातील लोकांना चांगल्या संधी मिळतील. नोकर बदलण्याचा प्रयत्न कराल. त्यात तुम्हाला यश मिळेल.
वृषभ राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
वृषभ राशीसाठी बुधाचे संक्रमण धर्म आणि अध्यात्मात रुची वाढवणार असेल. नशीब तुमच्या बाजूने राहिल. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. परदेशी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील.
कन्या राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
कन्या राशीसाठी बुधाचे संक्रमण यश देईल. तुम्ही काही मोठे काम सुरु कराल. प्रेमसंबंधित प्रकरणांमध्ये तीव्रता राहिल. प्रेमविवाह होऊ शकतो. कौटुंबिक सदस्य आणि भावंडांचे सहकार्य मिळेल.
तुळ राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
तुळ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण चांगले राहिल. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील. वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. या काळात मोठे यश मिळेल. आई-वडिलांच्या आरोग्याबाबत चिंता वाटेल.
मकर राशीवर बुध संक्रमणाचा प्रभाव
मकर राशीसाठी बुधाचे संक्रमण अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. अनेक दिवसांपासून दिलेले पैसे परत मिळू शकतात. मालमत्तेसंबंधित प्रकरणे मार्गी लागतील. वक्तृत्वाच्या बळावर कठीण प्रसंगावर मात कराल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. बौद्धिक क्षमतेने अनेक समस्या सोडवाल.