तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख – 70306 46046
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहरमेफेड्रॉन (एम. डी), विक्री करणा-या ०२ इसमांना केले जेरबंद अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंलदार असे गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंमलदार विशाल दळवी यांना माहीती मिळाली की लष्कर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एम.जी रोड कोळसा गल्ली मध्ये लॉक मेकर्स दुकाना जवळ दोन इसम संशयीत रित्या उभे आहेत.लागलीच सदर ठिकाणी जावून सदर इसमांना ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) हुसेन नुर खान वय २१ वर्षे, रा. नवाझीस पार्क, लेन नं १०, संपन हाईटस, कोंढवा पुणे २) फैजान अयाज शेख वय २२ वर्षे, रा. भागोदय नगर, लेन नं ०२, कोंढवा पुणे. असे असल्याचे सांगितले त्यांचे ताब्यामधुन एकुण किं.रु. १५,७०,०००/-रु.चा, ऐवज त्यामध्ये ७७ ग्रॅम एम.डी हा अंमली पदार्थ, जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द लष्कर पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क) २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार संदेश काकडे, विशाल दळवी, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, रेहाना शेख, योगेश मोहीते यांनी केली.