तेज पोलीस टाइन्स : परवेज शेख 70306 46046
कोंम्बींग ऑपरेशन दरम्यान अवैध हुक्का पार्लरवर केली छापा कारवाई
दि.१८/०१/२०२५ रोजी रात्रीच्या दरम्यान मा. वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर पथकाकडील पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, व पोलीस अमलदार असे मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कॉम्बींग ऑपरेशन राबवुन हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरु असलेले हुक्का पार्लर चेकींग करीत असताना पोलीस अंमलदार तानाजी देशमुख यांना त्यांचे बातमीदाराने बातमी दिली की, हॉटेल स्वे मुंढवा, पुणे या ठिकाणी अवैधरित्या हुक्का पुरवला जातो अशी बातमी मिळाली.त्यावेळी लागलीच पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे व पोलीस स्टाफ असे बातमीबाबत वरिष्ठांना माहिती देवुन हॉटेल स्वे या ठिकाणी छापा टाकुन कारवाई करुन हॉटेलमध्ये मिळुन आलेले हुक्का पिण्याचे साहित्य त्यामध्ये हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर व इतर साहित्य असा एकुण ७,०००/- रु.किं.चा मुद्देमाल जप्त करुन हॉटेल चालक तसेच हॉटेल मॅनेजर यांचे विरुध्द सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) सन २०१८ कलम ४अ, २१अ अन्वये कारवाई करुन मुंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्ह २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, सपोनि. विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, पृथ्वीराज पांडुळे, शुभांगी म्हाळशेकर व संजयकुमार दळवी यांचे पथकाने केली आहे.