तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख – 70306 46046
न्यूज रिपोर्ट – फिरोज शेख
पुणे Kondhwa दि. १६/०१/२०२५ रोजी दुपारी १३/०० वा. चे सुमारास ट्रिनिटी कॉलेज बोपदेव घाट येथे कॉलेज बाहेरील सार्वजनीक रोडवर काही मुलांमध्ये वाद व भांडणे झाली होती त्यात फिर्यादी नामे विश्वजीत बाबाजी हुलवळे वय १९ वर्षे रा. सध्या येवलेवाडी, कोंढवा बुगा यास कोयत्याने मारहाण करून जबर दुखापत केल्याने फिर्यादीने फिर्याद दिल्यावरून कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोली निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अब्दुल रौफ शेख, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी कोंढवा पोलीस स्टेशनकडील तपासपथकाला वरील गंभीर दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते. त्या संदर्भाने कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दि. १८/०१/२०२४ रोजी सायंकाळी पेट्रोलींग करीत असताना तपास पथकातील पोलीस हवालदार सतिश चव्हाण व विशाल मेमाणे यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारांमार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी हे आरोपी नामे राज रोंगे, याच्यायेवलेवाडी येथील सिंगापुर होम्स, येथील फ्लॅट नं ३०१, मध्ये लपले आहेत अशी बातमी मिळाल्याने कोंढवा तपास पथकातील स्टाफच्या मदतीने तेथे जाऊन वरील गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे १) भावेश बाळासाहेब कुंजीर, वय २३ वर्षे, रा. हिवरकर मळा, सह्याद्री सोसायटी, इंडियन ऑईल पेट्रोल पंपा समोर, सासवड, पुणे., २) अथर्व कैलास पवार, वय २१ वर्षे, रा. स.नं. ५४/सी/१, ओम सोसायटी, बी.टी. कवडे रोड, दळवी नगर, घोरपडी, पुणे., ३) सुरज सचिन राऊत, वय २१ वर्षे, रा. द लेक डिस्टीक सोसायटी, सासवड-बोपदेव घाट रोड, येवलेवाडी, पुणे., ४) आर्यन विलास पवार, वय १८ वर्षे, रा. स.नं. ५४/सी/१, ओम सोसायटी, बी.टी. कवडे रोड, दळवी नगर, घोरपडी, पुणे., ५) सौरभ प्रदिप लोंढे, वय १८ वर्षे रा. संदेश सहकारी सोसायटी, फ्लॅट नं ५०३, संभाजीनगर, धनकवडी, पुणे मुळ रा. मु.पो. सातेफळ, सौंदना (ढोकी), ता. कळंब, जि. धाराशिव., ६) राज दिगंबर रोंगे, वय १९ वर्षे, रा. सिंगापुर होम्स, तिसरा मजला, फ्लॅट नं ३०१, विठ्ठल मंदिर समोर, येवलेवाडी, कोंढवा बु., पुणे (मुळ रा. मु.पो. खर्डी, ता. पंढरपुर, जि. सोलापूर.), व ७) वरून बबन भोसले, वय २१ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. आनंदनगर, जेजुरी, ता. पुरंदर जि. पुणे. यांना व त्यांनी गुन्ह्यात ताब्यात घेवुन गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांनी सदर गुन्ह्यात अटक करून सदर आरोपी यांना माननीय न्यायालय समक्ष हजर करून त्यांची पोलीस रिमांड घेवुन त्यांचेकडुन गुन्ह्यात वापरलेली धारदार शस्त्रे व वाहने असा एकुण ३,८०,०००/- रू किं चा मुद्देमाल गुन्ह्याच्या अनुषगांने जप्त केला आहे. त्यांच्याकडे सदर गुन्ह्यात त्यांचे आणखी साथीदार असल्याबाबत अधीक तपास करीत आहोत.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त साो., मा. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त साो., श्री रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त साो., पुर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो., परिमंडळ-५, डॉ, श्री राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त साो., वानवडी विभाग, श्री धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो., विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अब्दुल रौफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री सुरज बेंद्रे, यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार अमोल हिरवे, सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके पोलीस अंमलदार संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, शाहिद शेख, सुरज शुक्ला, सागर भोसले, सुजित मदन, राहुल थोरात, यांच्या पथकाने केली आहे.