Pune-येमेनी परदेशी नागरीकांवर पुणे पोलिसांची कारवाई

Pune-येमेनी परदेशी नागरीकांवर पुणे पोलिसांची कारवाई

तेज पोलीस टाइम्स Online : परवेज शेख 70306 46046

Kondhwa-पुणे शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असणा-या येमेनी परदेशी नागरीकांवर पुणे पोलिसांची कारवाईपुणे शहरामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करणा-या परदेशी नागरीक यांची तपासणी मोहीम विशेष शाखा अंतर्गत परकीय नागरीक नोंदणी विभाग (एफ आर ओ) यांचे कडून राबविण्यात येत आहे. सदर कारवाई अंतर्गत कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत परदेशी नागरीक रहाणा-या सोसायट्यांची तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. सदर मोहीमे अंतर्गत मोनार्च रेजेन्सी १ व २ एन आय बी एम उंद्री रोड, कोंढवा या सोसायटीत ५ येमन पुरूष व २ यमन महिला बेकायदेशीरपणे पासपोर्ट / विजा मुदत संपल्या नंतरही वास्तव्यास असताना दिसून आले आहे.शहरात शिक्षण, व्यवसाय, तसेच उपचारांसाठी मोठ्या संख्येने परदेशातील नागरिक वास्तव्यास येतात. काही परदेशी नागरिक व्हिस्साची मुदत संपल्यानंतर बेकायदा वास्तव्य करतात.त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या कागदपत्रांची परकीय नागरीक नोंदणी विभाग (एफ आर ओ) विशेष शाखा पुणे शहर याच्याकडुन चौकशी करुन त्याना (Leave India Notice) लिव इंडिया नोटीस देवुन त्यांच्या मायदेशात परत पाठविण्याची (Deportation) कारवाई सुरू आहे.

मा. पोलिस आयुक्त पुणे शहर श्री अमितेशकुमार यांनी शहरामध्ये बेकायदेशीररित्या राहणा-या सर्व परदेशी नागरीकांना (Leave India Notice) लिव्ह इंडिया नोटीस देवून (Deportation) कारवाई पुणे शहरात व्यापक स्तरावर सुरू केली आहे.

Comments (0)
Add Comment