तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख 70306 46046
न्यूज रिपोर्ट : फिरोज शेख
सराईत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस केले जेरबंद
दि.२८/०२/२०२५ रोजी युनिट ६ पथकातील अधिकारी व अंमलदार असे वाघोली पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना घरफोडीचे गुन्हे करणारा अभिलेखावरील एक आरोपी हा डी. मार्ट जवळ, लोहगाव वाघोली रोड, वाघोली, पुणे येथे उभा असल्याचे गोपनीय बातमी प्राप्त झाली.सदर प्राप्त बातमीच्या अनुषंगाने पथकासह सदर ठिकाणी जावून खात्री केली असता इसम नामे राहुल दगडू शिंदे, वय ३२ वर्षे, रा. पिंरगुट, पुणे हा संशयितरीत्या मोटार सायकल सह उभा असताना मिळून आला. नमूद इसमाकडे मो/सा बाबत तसेच सदर ठिकाणी हजर असल्याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देऊन लागला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या वर्णनाचे एकूण ८७ ग्रॅम सोन्याचे दागिने, एकूण किंमत रु. ०६,४०,३२२/-मिळून आले. तसेच पोलीस अमंलदार पवार यांनी नमुद आरोपीताकडे त्याचे ताब्यातील मो/सा बाबत चौकशी केली असता नमुद मो/सा ही चोरीची असल्याचे आणि त्याने आणखी एक मो/सा चोरी केल्याची माहिती मिळून आली.नमूद आरोपीताकडे केलेल्या अधिक चौकशी मध्ये त्याने सदरचे सोन्याचे दागिने हे लोणीकंद व लोणी काळभोर पो. ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्याचे ताब्यातील मो/सा ही रावेत पो. ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकंदरीत तपासामध्ये खालील नमूद घरफोडीचे व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.घरफोडीचे गन्हेलोणीकंद हस्तगत मालमत्ता किं. रू.०७,४०,३२२/- असे सदर आरोपीतांविरुद्ध पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात चोरी, घरफोडी आणि मो/सा चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा, युनिट ६ प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, स.पो.नि. मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे गणेश डोंगरे, नितीन धाडगे, प्रतिक्षा पानसरे, चालक पो. अंमलदार सुहास तांबेकर यांनी केली आहे.