Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
वीर पहारियाच्या ‘स्काय फोर्स’ची सहा दिवसांत इतकी कमाई, बजेट तरी वसूल करणार का सिनेमा? - TEJPOLICETIMES

वीर पहारियाच्या ‘स्काय फोर्स’ची सहा दिवसांत इतकी कमाई, बजेट तरी वसूल करणार का सिनेमा?

sky force box office collection day 6:बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार तसंच वीर पहारिया यांच्या स्काय फोर्स सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: अक्षय कुमार चा स्काय फोर्स चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. त्यामुळं अक्षय कुमारच्या करिअरमधला फ्लॉप सिनेमांची साखळी या सिनेमानं मोडली आहे. गेल्या काही वर्षात अक्षय कुमारचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकले नाहीत. करोना लॉकडाऊननंतर त्याचे सात ते आठ सिनेमे प्रदर्शित झाले, पण यातला एकच सिनेमा बऱ्यापैकी हिट ठरला होता. बाकीच्या सिनेमांना प्रेक्षकांना नकार दिला होता. आता स्काय फोर्समुळं फ्लॉपचा टॅग पुसला जाणार आहे.

अक्षय मुख्य भूमिकेत असला तरी या सिनेमात वीर पहारिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे, तसंच सारा अली खान आणि निमरत कौर यांच्याही भूमिका आहेत. दमदार ओपनिंगनंतर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पकड कायम ठेवली आहे. सहाव्या दिवशीही सिनेमानं चांगली कमाई केली आहे.

स्काय फोर्सनं सहाव्या दिवशी किती केली कमाई?
२४ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर विकेंडचा सिनेमाला चांगलाच फायदा झाल्याचं दिसून आलं. १९६५च्या भारत पाक यु्द्धाच्या सत्य घटनेवर हा सिनेमा बेतला आहे. सिनेमाला समिक्षक तसंच प्रेक्षकांचेही सकारात्मक रिव्ह्यू पाहायला मिळत आहेत.

वीर पहारियाच्या ‘स्काय फोर्स’ची सहा दिवसांत इतकी कमाई, बजेट तरी वसूल करणार का सिनेमा?

निर्मात्यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार यासिनेमानं १५.३० कोटींची ओपनिंग केली आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं २६.३० कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी सिनेमाची कमाई ३१.६० कोटी इतकी होती. तर चौथ्या दिवशी सिनेमाची कमाई घटली. सिनेमानं फक्त ८.१० कोटींची कमाई केली होती. सिनेमानं चार दिवसांत ८१.३० कोटींची कमाई केली होती. तर पाचव्या दिवशी सिनेमानं ५.७५ कोटींची कमाई केली होती. सहाव्या दिवशीही स्काय फोर्स सिनेमानं पाच कोटींच्या जवळपास कमाई केली. त्यामुळं सहा दिवसांत सिनेमाची कमाई ९२ कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. लवकरच हा सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणार आहे.

बजेट किती?
सिनेमाचं बजेट हे १६० कोटींचं असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं हा बजेट वसूल करणार की नाही? हे येत्या काही दिवसांत कळेल.
बॉक्स ऑफिसवर आणखी दोन सिनेमांची टक्कर
तर आता येत्या विकेंडला बॉक्स ऑफिसवर शाहिद कपूरचा देवा आणि मराठी सिनेमा देवाचं घर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळं या चित्रपटांमुळं स्काय फोर्सच्या कमाईवर परिणाम होणार आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”आणखी वाचा

Source link

akshay kumar and veer pahariyabox office updates in marathisky force box office collectionsky force box office collection day 6sky force castsky force storyअक्षय कुमारबॉक्स ऑफिस बातम्या मराठीवीर पहारियास्काय फोर्स बॉक्स ऑफिस कलेक्शन
Comments (0)
Add Comment