सातारा आणि कराड पोलिसांनी बेकायदा पिस्तूल विकणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख 70306 46046

न्यूज़ रिपोर्ट – सादिक शेख सातारा

दिनांक २९/०१/२०२५ स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व कराड शहर पोलीस स्टेशन यांची धडाकेबाज कारवाई

पिस्टल विक्री करणेकरीता आलेल्या टोळीकडुन २ पिस्टल व ३ जिवंत काडतुस असा एकुण १,६०,०००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदा बिगरपरवाना स्वतःचे जवळ पिस्टल बाळगणारे व बेकायदेशीर पिस्टलची विक्री करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पोलीस निरीक्षक श्री. राजु ताशिलदार यांना दिलेल्या आहेत. त्या अनुशंगाने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणें स्थागुशा सातारा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, यांचे मार्गदर्शनाखाली संयुक्त पथक तयार करुन त्यांना अवैध शस्त्रांबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.
दि.२८/०१/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पोलीस निरीक्षक श्री. राजु ताशिलदार कराड शहर पोलीस स्टेशन यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, इसम नामे आक्या चव्हाण हा कार्वे नाका ते गोळश्वर जाणारे रोडवर बेकायदेशीर विनापरवाना पिस्तुले व त्यास लागणारी काडतुसे विक्री करणेसाठी थांबुन आहे. त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणें स्थागुशा सातारा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर कराड शहर पोलीस स्टेशन, यांचे संयुक्त पथक तयार करुन त्यांना मिळाले बातमीप्रमाणे सुचना देवून त्यांना नमुद इसमास ताब्यात घेवून आक्षेपार्ह काही मिळुन आल्यास कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद पथकाने कार्वेनाका ते गोळेश्वर परिसरात मिळाले बातमीप्रमाणे सापळा लावून बातमीमधील इसमास व त्याचे सोबत असलेले दोन इसमांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता, त्यांचेकडे १,६०,०००/- किंमतीचे त्यामध्ये दोन पिस्टल व तीन जीवंत काडतुसे मिळुन आली ती हस्तगत करुन त्यांचे विरुध्द कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ८९/२०२५ भारतीय हत्यार अधिनियम ३, २५ भारतीय न्याय संहिता कलम १११ अन्वये नोंद केला आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर २०२२ पासून ते आजपावेतो एकूण १११ देशी बनावटीची पिस्टल, ४ बाराचोर बंदक २ रायफल, २६० जीवंत काडतुसे, ३८४ रिकामी काडतुसे, ५ रिकामे मॅगझीन जप्त करण्यात आलेली आहेत.

कामगिरी श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री. अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार कराड शहर पोलीस स्टेशन, सपोनि दत्तात्रय दराडे, सपोनि रोहित फाणें स्थागुशा सातारा, सपोनि अशोक भापकर, कराड शहर पोलीस स्टेशन, पोउनि विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर स्थागुशा सातारा, कृष्णा डिसले, कराड शहर पोलीस स्टेशन, स्थागुशाचे पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, गणेश कापरे, ओंकार यादव, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रवीराज वर्णेकर, शिवाजी गुरव तसेच कराड शहर पोलीस स्टेशनकडील विजय मुळे, अनिल स्वामी, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, संग्राम पाटील, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी कारवाई केली.

या कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Comments (0)
Add Comment