Pune-विधीसंघर्षीत बालकांकडुन २ दुचाकी गाड्या जप्त विद्यापीठ पोलीस स्टेशन

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख 70306 46046

न्यूज रिपोर्ट : फिरोज शेख पुणे

Pune-विधीसंघर्षीत बालकांकडुन २ दुचाकी गाड्या जप्त करुन वाहन चोरीचा गुन्हा उघडकीसभारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबच्या सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे हे पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरांचा शोध घेत असताना बाबर डेअरी जवळ आले असता त्यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७५/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) या गुन्हयातील चोरी गेले स्प्लेंन्डर दुचाकी गाडी सह विधीसंघर्षीत बालक मिळुन आल्याने त्यांचेकडुन दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.विधीसंघर्षीत बालकांकडे अधिक तपास करता त्यांनी एक हिरो होंडा कंपनीची सीडी डॉन ही दुचाकी गाडी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने ती गाडी जप्त करण्यात आली आहे. सदर गाडी बाबत तपास चालु आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांच्या पथकाने केली आहे.

Comments (0)
Add Comment