Weekly Numerology Prediction 3 February To 9 February 2025 :
फेब्रुवारी महिन्यात प्रभावशाली लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो आहे त्याचा प्रभाव प्रत्येक मूलांकावर पहायला मिळेल. हा राजयोग व्यवसायात नफा, करिअरमध्ये प्रगती आणि सुखसमृद्धीचे योग घेवून येणार आहे. मूलांक 1 साठी धनलाभ असून मानसिक शांतता मिळेल. मूलांक 5 च्या जातकांसाठी नवीन गुंतवणुक लाभदायक तर मूलांक 9 चा खर्च वाढतोय लक्ष देणे गरजेचे आहे. चला, पाहूया फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात तुमचा मूलाकं काय सांगतो? मूलांक 1 ते मूलांक 9 साठी आठवडा कसा असेल ते पाहूया.
मूलांक 1 (जन्म तारीख 1, 10, 19, 28): धनलाभ, मानसिक शांतता मिळेल
कार्यक्षेत्रात प्रगती असून मान-सम्मान वाढेल. आर्थिक बाबतीत नवीन विचारांसह पुढे जात राहिल्यास उत्तम परिणाम दिसून येतील आणि धनलाभाची स्थिती अधिक वाढेल. लवलाइफ ठिक असून तुम्ही भविष्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा निर्णय घेणार आहात. आठवड्याच्या शेवटी अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे तसेच मन प्रसन्न राहील.
मूलांक 2 (जन्म तारीख 2, 11, 20, 29): सुखसमृद्धीचे योग, खर्च जास्त होणार
लवलाइफ ठिक असून सुखद अनुभव मिळतील आणि परस्परांमधील प्रेम अधिक दृढ होईल. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धीचे शुभ योग तयार होत आहेत. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये जेव्हढी मेहनत कराल तेव्हढे भविष्यात तुम्हाला मोठे यश मिळेल. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार आहेत. आर्थिक बाबतीत खर्च अधिक आहेत, त्याकडे कटाक्षाने लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी कोणाच्या तरी बाह्य हस्तक्षेपामुळे तुम्हाला जास्त त्रास होईल.
मूलांक 3 (जन्म तारीख 3, 12, 21, 30): भागीदारीतील व्यवसायात नफा
कार्यक्षेत्रात उत्तम यश आणि भागीदारीतील व्यवसायात चांगला नफा आहे. क्रिएटीव्ह कामे जास्त करणार आहात, त्यामुळे तुमचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत धनलाभाची शक्यता असून गुंतवणुकीतून फायदे होतील. प्रेमसंबंधासाठी वेळ चांगली आहे तसेच नात्यामध्ये आपलेपणा वाढेल. आठवड्याच्या शेवटी कोणत्यातरी गोष्टीवरून मन दु:खी होईल.
मूलांक 4 (जन्म तारीख 4, 13, 22, 31): अहंकारापासून दूर राहा
आर्थिक बाबतीत परिस्थिती अनुकूल असून धनलाभाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्यासाठी शुभफल घेवून येणार आहेत. प्रेमसंबंधात अहंकारापासून दूर राहा, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी नवीन दृष्टिकोनासह तुम्ही जीवनात पुढे पुढे वाटचाल करणार आहात तसेच वेळ उत्तम आहे.
मूलांक 5 (जन्म तारीख 5, 14, 23): नवीन गुंतवणुक लाभदायक
कार्यक्षेत्रात प्रगती असून या महिन्यात ऑफिसमध्ये काही बदल करणार आहात. आर्थिक बाबतीत धनलाभ असून नवीन गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. प्रेमसंबंधात नवीन सुरुवात तुमच्या जीवनात सुखशांती समाधान घेवून येईल. आठवड्याच्या शेवटी काही नवीन होणार असून मानसिक आनंद मिळेल.
मूलांक 6 (जन्म तारीख 6, 15, 24): कामाचे कौतुक होणार
कार्यक्षेत्रात प्रगती असून प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील. या महिन्यात मान-सन्मान वाढणार आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. लवलाइफ उत्तम आहे आणि प्रेमजीवनात सुखद अनुभव मिळतील. या महिन्यात केलेली गुंतवणूक लाभदायक आहे. आठवड्याच्या शेवटी मेहनत फळाला येईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती उत्तम असेल.
मूलांक 7 (जन्म तारीख 7, 16, 25): संवादाने प्रश्न सोडवा
या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये हळूहळू सुधारणा होईल. आर्थिक बाबतीत धनलाभ आहे. प्रेमसंबंधात कोणताही निर्णय घेताना सखोल विचार करा आणि घाई टाळा. आठवड्याच्या शेवटी काही मुद्दे संवादाद्वारे सोडवू शकाल आणि त्याचे उत्तम परिणाम पहायला मिळतील.
मूलांक 8 (जन्म तारीख 8, 17, 26): प्रोजेक्टमध्ये उत्तम यश
कार्यक्षेत्रात प्रगती असून प्रोजेक्टमध्ये उत्तम यश मिळाल्यामुळे आनंद मिळेल. आर्थिक बाबतीत या आठवड्यात काही अडचणी आहे. तसेच एखादी बातमी तुमचे मन उदास करु शकते. प्रेमसंबंधात संवादाद्वारे मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला उत्तम परिणाम दिसून येईल. आठवड्याच्या शेवटी तुमचं मन अस्वस्थ राहील आणि मानसिक अडचण वाढण्याची शक्यता आहे.
मूलांक 9 (जन्म तारीख 9, 18, 27): आर्थिक बाबतीत खर्च जास्त
प्रेमसंबंधात नाते अधिक मधुर होणार आहे. प्रेमजीवनात सुख-समृद्धीचे शुभ योग आहेत. नवीन सुरुवात तुमच्यासाठी आनंददायी असेल. आर्थिक बाबतीत खर्चाची स्थिती तयार होते आहे, तरी तुम्ही गुंतवणुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात अहंकारापासून दूर राहा, म्हणजे चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी कोणताही महत्त्वाचा निर्णय टाळा, ते तुमच्यासाठी फायदेशीर असेल.