तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
न्यूज व जाहिरात साठी संपर्क : 70306 46046
Pune Online News – कोंढव्यातील ट्रॅफिक सुरळीत होण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाय योजना आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे वाहतूक अधिकारी कुमार घाडगे यांचा सत्कार कोंढवा परिसरातील भरमसाठ वाढलेली लोकसंख्या तसेच वाहनांची संख्या ,वाहनांची अस्तव्यस्त पार्किंग, बेशिस्त वाहन चालक, अरुंद रस्ते, यासोबत टपरी-पथारी व्यवसायिकाचे अतिक्रमण या काही कारणांमुळे या परिसरात होणारी वाहतूक कोंडीमुळे कोंढवा भागातील नागरिक खूपच जास्त प्रमाणात त्रस्त व वैतागलेले होते. या समस्यांवर कोंढवा वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी कुमार घाडगे साहेब यांनी पुढाकार घेऊन प्रथमतः सोमजी चौक येथील रस्त्यांवर बॅरिकेट लावून वाहतूक सुरळीत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला व त्यानंतर या भागातील शितल पेट्रोल पंप ते फखरी हिल्स सोसायटी तसेच एन. आय.बी.एम रोड, उंड्री या ठिकाणी याच प्रकारे उपाययोजना केली. ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास हातभार लागला तसेच पोलिसांचा ताण सुद्धा काही प्रमाणात कमी झाला. यासोबत नागरिकांचा प्रवासाचा वेळ तसेच इंधन वाचण्यास मदत होत आहे, याबाबत नागरिकांकडून उस्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे. यासाठी कोंढवा वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी कुमार घाडगे साहेब यांचा आझाद रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक शफिकभाई पटेल यांनी चॉकलेट पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अखिल नागरिक एकता मंचचे अध्यक्ष छबीलभाई पटेल, आझाद संघटनेचे पदाधिकारी सुभाष धस, अब्दुल मुखीत खान, रफिक शेख, सरफराज शेख, अब्दुल रौफ शेख, आसिफ शेख, मुन्नाभाई शेख, आबिद शेख युसुफ शेख, मोहसीन शेख तसेच इतर रिक्षा चालक बहुसंख्येने उपस्थित होते.याबाबत बोलताना वाहतूक अधिकारी कुमार घाडगे साहेब म्हणाले की योग्य पद्धतीने प्लॅनिंग करून कोंढव्यातील मोठ्या रस्त्यांवरील वाहतूक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यामध्ये यशही मिळत आहे. नागरिकांचा प्रवासासाठीचा वेळही वाचत आहे, यासोबत वाहतूक कर्मचाऱ्यांची दमछाक सुद्धा काही प्रमाणात कमी होत आहे. आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे या प्रकारे सत्कार होत असल्याने आम्हाला सुद्धा अजून जास्त चांगले काम करण्यासाठी बळ तसेच स्फूर्ती मिळत आहे. लवकरच या भागातील मिठानगर व इतर छोटे रस्ते यावर सुद्धा मार्ग काढण्यात येईल, यासाठी नागरिकांतर्फे सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे.