Numerology Prediction, 3 February 2025 : आज बुधादित्य राजयोग असून मूलांक 1 असणाऱ्यांना कामासाठी खूप मेहनत आहे. मूलांक 5 च्या जातकांनी सकारात्मक विचार करावा. या मूलांकाची कामे वाढत आहेत पण मदत मिळत नाही अशी स्थिती आहे. तुम्ही घाबरू नका, मदत मिळणार. चला तर पाहूया मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – मित्रांची मदत कामे होणार पटापट

आजचा दिवस ठिक आहे पण तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. मित्र तुम्हाला कामात मदत करतील. तुमच्या कौशल्यांबद्दल लोकांना शंका असेल पण तुम्ही हार मानू नका. प्रयत्न करा तुम्ही सफल नक्की व्हाल. तब्येतीची काळजी घ्या.
मूलांक 2 – नात्यामधील दुरावा कमी करणार

आजचा दिवस ठिक असून तुम्ही मनापासून काम करणारा आहात. नातेसंबंधातील दुरावा कमी करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करणार आहात. त्यात तुम्हाला नक्की यश मिळे. तुमची कामे वेळेत पूर्ण होतील. संवाद साधताना थोडा संकोच असेल पण मनातील गोष्टी इतरांसोबत शेअर केल्या तर मन हलकं होईल.
मूलांक 3 – घरी वेळ देणे महत्त्वाचे आहे
आजचा दिवस ठिक असून तुम्ही कामात व्यस्त राहणार आहात. तुम्ही कोणाला भेटायला जात असाल तर स्वतःवर लक्ष केंद्रीत करा. कुटुंबात सुख शांती समाधान नांदावे असे तुम्हाला वाटत असेल तर घरीसुद्धा वेळ द्या. घर आणि ऑफिसमध्ये समतोल ठेवा.
मूलांक 4 – मुलांकडून चांगली बातमी मिळणार
आजचा दिवस ठिक आहे पण तब्येतीकडे लक्ष द्या. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि अस्वस्थ जाणवले तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. ध्यान धारणा, योगा यात खंड पडू देवू नका. कुटुंबात वातावरण ठिक असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळणार त्यामुळे मन प्रसन्न राहील.
मूलांक 5 – सकारात्मक विचार करा
आजचा दिवस ठिक आहे पण कामात काही अडचणींचा डोंगर उभा राहील. तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत असाल, निर्णय काय घ्यायचा ते कळणार नाही. पण तुम्ही संकटावर मात कराल. आज घरी मंगलकार्याचे आयोजन होवू शकते. त्यासाठी नक्की वेळ काढा. सकारात्मक विचार ठेवा.
मूलांक 6 – प्रवास करणार असाल तर बॅग पुन्हा पाहा
आजचा दिवस ठिक असून तुम्ही कुटुंबाला चांगला वेळ देणार आहात. तसेच घरातील शुभ कार्यावर खर्च करणार आहात. काही कारणामुळे धावपळ होवू शकते, तब्येत सांभाळा. आज प्रवास करणार असाल तर तुमची बॅग अवश्य चेक करा. आज कामे करताना सतर्क राहा. कामात बारीक लक्ष द्या आणि फोकस ठेवा.
मूलांक 7 – मुलांकडून चांगली बातमी मिळेल
आजचा दिवस ठिक आहे. खास करून जे अविवाहीत आहेत, त्यांच्या विवाहाचा योग जुळून येतो आहे. आज अडचणीत कोणीतरी मदतीला येईल. घरी आणि ऑफिसमध्ये कामे वाढणार आहेत त्यामुळे कामात नियोजन करा. मुलांकडून तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे.
मूलांक 8 – मेहनत जास्त आहे
आजचा दिवस फारसा ठिक नाही तुमच्या मूडमध्ये चढउतार जाणवणार आहे. कामासंदर्भात एखाद्या व्यक्तीसोबत चर्चा लांबू शकते. तसेच काही नवीन निर्णय घेणार आहात. घरात वातावरण ठिक असेल, तुम्ही वादविवादापासून लांब राहा. खेळ आणि शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्यांना जास्त मेहनत आहे.
मूलांक 9 – कामे भरपूर आहेत, मदत नक्की मिळणार
तुम्हाला आध्यात्मिक कामात रुची असते. आज आध्यात्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेणार आहात. आज कोणाला तरी मदत करण्याची संधी मिळेल. आज कोणीतरी तुमची जवळची व्यक्ती तुम्हाला मदत करेल त्यामुळे तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल. कामे खूप वाढत आहे पण लक्षात ठेवा तुम्हाला नक्की मदत मिळेल.