Finance Horoscope Today 4 February 2025 In Marathi : 4 फेब्रुवारी, मंगळवार रोजी गुरु ग्रह वृषभ राशीत मार्गी होणार आहे. त्यामुळे गुरु आणि शुक्र यांचा उच्चकोटीचा परिवर्तन राजयोग तयार होतोय. या लाभ वृषभ, कन्या सह ५ राशींच्या लोकांना भरपूर प्रमाणात होणार आहे. सुखसमृद्धीचा योग, करिअरमध्ये यश असून व्यवसायात दुप्पट नफा आहे. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिफल : आळस सोडा कामाला लागा

मेष राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये लाभदायक दिवस असून तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. तसेच मन खूप प्रसन्न राहणार आहे. तुम्ही तुमच्या कामात जास्त लक्ष दिले तर बरे होईल. आज तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवसाच्या सुरुवातीला काही काळ आळस जाणवेल, काहीच करु नये असे वाटेल पण असे करु नका यामुळे समस्या वाढतील. तुमच्या समस्येचे कारण ताणतणाव आहे. संध्याकाळी घरी जास्त वेळ घालवणे फायदेशीर ठरेल.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात नफा, करिअरमध्ये दुप्पट लाभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस यशाने भरलेला आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला काही नवीन कामे मिळणार आहेत. प्रत्येक कामात नशिबाची साथ असल्यामुळे प्रतिष्ठा वाढेल आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात यश मिळेल. गुंतवणुकीच्या बाबतीत नफा होईल आणि तुम्ही भविष्यातील योजनांवर काम सुरू कराल. एकूणच दिवस सर्वोत्तम आहे असे म्हणावे लागेल.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : नोकरी संदर्भात चांगली बातमी मिळेल
मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस उत्साहाने भरलेला असेल आणि दुपारपर्यंत तुम्हाला नोकरी संबंधित चांगली बातमी मिळणार आहे त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे म्हणजे तुम्हाला फायदा होईल. व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करा, तुमची कामे पटापट होणार आहेत. तसेच तुम्हाला खूप फायदा होईल.
कर्क आर्थिक राशिभविष्य : धाडसी निर्णय घेऊ नका
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस विशेष असू शकतो. तुम्ही कोणत्या तरी एका गोष्टीवर फोकस ठेवा अन्यथा एक ना धड भाराभार चिंध्या अशी अवस्था होईल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत फार प्रयोग करु नका त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. आज कोणतेही धोकादायक पाऊल उचलू नका. कुटुंबातील तुमचे विरोधक आज शांत असतील. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आज गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा, अधिक माहिती घ्या तसेच तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
सिंह आर्थिक राशिभविष्य : रखडलेली कामे मार्गी लागतील
सिंह राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल आणि तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुमचे मन खूप आनंदी असेल. तुमच्या मनात काही कल्पना असतील किंवा एखादी नवीन योजना कार्यान्वीत करायची असेल तर त्वरीत करा. तुम्हाला आज शुभलाभ होणार आहे. कुटुंब आणि नातेवाईकांसोबतच्या जुन्या तक्रारी दूर होतील. प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ मिळेल. मित्र तुम्हाला कामात मदत करतील. काही छोट्या कारणामुळे कुटुंबासोबत वाद होण्याची शक्यता आहे.
कन्या आर्थिक राशिभविष्य : मदत केली तर मदत मिळते
आजचा दिवसभर तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात. बुद्धी चातुर्य वापरुन अडचणींवर मात करावी लागेल. व्यवसायात अधिक मेहनत गरजेची आहे. तर फायदा होणार. तुम्ही इतरांना मदत करा, लक्षात ठेवा तरच समोरची व्यक्ती तुम्हाला मदत करेल. तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. आर्थिक अडचणी थोड्याफार दूर होतील.
तूळ आर्थिक राशिफल :कामे पूर्ण होणार, धनलाभाचा योग
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून तुम्हाला प्रत्येक कामात लाभ होणार आहे. तुमची सगळी काम पूर्ण होतील आणि तुम्हाला समाधान मिळेल. घर आणि कुटुंबात सुख शांती असेल. तुमचे पैसे जे अडकले होते ते परत मिळतील. तुमचे विरोधक आज तुमच्यावर मात करु शकणार नाही. तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करण्याची शक्यता आहे.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : वादविवादापासून दूर राहा
वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश तसेच व्यवसायात आज जे काम हाती घ्याल त्यात फायदा होईल. आरोग्याच्या बाबतीत एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. तुम्ही शांतपणे काम करा. आज कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला तणाव होईल आणि काम करण्याची इच्छा कमी होईल.
धनू आर्थिक राशिभविष्य : सरकारी कामे होणार
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मान-सन्मानाचा आहे. तुमचे विरोधी देखील तुमची प्रशंसा करतील. सरकारकडून तुम्हाला फायदा होईल आणि सरकारी कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुम्ही खूप खुश व्हाल. जी कामे अडकली होती ती पूर्ण होतील. तुम्हाला सासरकडून आज धनलाभ होणार आहे. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल आणि त्यातून तुम्हाला समाधान मिळेल.
मकर आर्थिक राशिफल : काम आणि खर्च वाढणार
मकर राशीच्या लोकांना आजच्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणीत होणार आहे. कुटुंब आणि पैशाच्या बाबतीत तुम्हाला यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल. ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील. संध्याकाळी कोणत्याही वादात पडू नका. रात्री पाहुणे येण्याती शक्यता आहे. त्यामुळे काम आणि खर्च दोन्ही वाढणार आहे. एकूणच दिवस आनंदात जाणार आहे.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : वाद करु नका, ताणतणावात वाढ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. तुमची जी कामे सुरू होतील ती अडकू शकतात. तुम्ही नकळत एखाद्या वादात सापडू शकता आणि त्यामुळे तुमचे शत्रू वाढणार आहेत. तुमच्या बुद्धीचा वापर करून केलेले काम देखील आजे तुमचे नुकसान करू शकते. म्हणून कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करा. कामातील नुकसान आणि निराशा यामुळे तुम्हाला मनस्ताप होईल. काही वाईट बातमी ऐकून तुम्हाला अचानक कुठेतरी जावे लागू शकते. म्हणून सावध रहा आणि वादात पडू नका.
मीन आर्थिक राशिभविष्य : प्रत्येक कामात यश
मीन राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी उत्तम असून तुम्हाला कामात यश मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या कमी होणार आहेत. आज सासरच्या मंडळींसोबत आर्थिक व्यवहार करु नका किंवा तुम्ही त्यांच्याकडून काही उधार घेऊ नका, यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा प्लॅन करणार आहात. आज धार्मिक कार्यात खर्च करणार आहात. प्रवासाचा योग आहे पण प्रवासाता काळजी घ्या कारण चोरी होण्याची शक्यता आहे.