Pune-बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या आरोपींना येरवडा तपास पथक कडून बेडया

Pune-बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या आरोपींना येरवडा तपास पथक कडून बेडया

तेज पोलीस टाइम्स-परवेज शेख 70306 46046

फिरोज शेख – पुणे

दिनांक ०५/०२/२०२५ रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वाडिया बंगलाजवळ, येरवडा, पुणे येथे दोन इसम अग्नीशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, तुषार खराडे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन दोन संशयीत इसमांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे १ पिस्टल व १ राऊंड मिळून आले. त्यांस त्यांचा नाव पत्ता विचारता १. प्रविण विकास कसबे वय २९ वर्षे रा आंबेगाव कात्रज पुणे २. प्रतिक दादासाहेब रणवरे वय २५ वर्षे रा येवलेवाडी पुणे असे असल्याचे सांगितले. सदरबाबत दि. ०५/०२/२०२५ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गु र नं १०४/२०२५ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण ३०,०००/- रु किंमतीचे एकूण १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपरींना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास तपास पथकाचे सपोनि सुनिल सोळुंके करत आहेत.

सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह-आयुक्त, श्री मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री हिम्मत जाधव, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, श्रीमती प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, श्री. रविंद्र शेळके, वपोनि येरवडा, पल्लवी मेहेर, पोनि गुन्हे, स्वाती खेडकर, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि सुनिल सोळंके, सर्व्हेलन्स अधिकारी पोउपनि महेश फटांगरे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा १४२३ दत्ता शिंदे, पोहवा २९२५ तुषार खराडे, पोहवा ३२७२ किरण घुटे, पोहवा ७५१९ सागर जगदाळे, पोअं ८३३७ अनिल शिंदे, पोअं १०७४९ अमोल गायकवाड, पोअं ८२७३ विशाल निलख, पोअं १०३६७ प्रशांत कांबळे, पोअं १०४८६ बालाजी सोगे यांनी केलेली आहे.

Comments (0)
Add Comment