Loveyapa Box Office Collection : जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या ‘लव्हयापा’ सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई जाणून घेऊया.
‘लव्हयापा’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लव्हयापा हा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट ‘लव्ह टुडे’चा रिमेक आहे. ‘लव्हयापा’ हा चित्रपट व्हॅलेंटाईन आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. मात्र, ‘लवयापा’ला प्रेक्षकांचं प्रेम मिळत असल्याचं दिसत नाही. रिलीजच्या पहिल्याच दिवशी, हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये उत्सुकता दाखवत होता. पण, चित्रपटाच्या ट्रेलरला आणि त्यातील गाण्यांना विशेष प्रतिसाद मिळाला नाही, ज्यामुळे त्याची चर्चा देखील फारशी खास नव्हती. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत.
बाप सुपरस्टार तर लेक फ्लॉप; जुनैदच्या’लव्हयापा’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली, पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी
सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘लव्हयापा’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी १.५० कोटी रुपये कमावले आहेत. जरी हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतर त्यात काही बदल होऊ शकतात.
‘लव्हयापा’चा पराभव
‘लव्हयापा’ बॉक्स ऑफिसवर हिमेश रेशमियाच्या ‘बॅडअॅस रवी कुमार’ सोबत टक्कर घेत आहे. हिमेशच्या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी खुशी आणि जुनैदच्या रोमँटिक कॉमेडीपेक्षा जास्त (२.७५ कोटी रुपये) कमाई केली आहे. अशा परिस्थितीत, असं दिसतंय की, बॅडअॅस रवी कुमार आठवड्याच्या शेवटीही ‘लव्हयापा’ धुवून टाकेल. सध्या सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसवर आहेत.
‘लवयापा’ ही कथा गौरव (जुनैद) आणि बानी (खुशी) यांच्याभोवती फिरते. त्यांच्या प्रेमकथेत अडचणी येतात जेव्हा खुशीचे वडील (आशुतोष राणा) त्यांना फोनची अदलाबदल करून त्यांचं प्रेम सिद्ध करण्याचं आव्हान देतात. ‘लव्हयापा’ या सिनेमामध्ये जुनैद खान आणि खुशी कपूर व्यतिरिक्त, ग्रुशा कपूर, युक्तम खोसला, तन्विका परळीकर, किकू शारदा, देवीशी मदन, आदित्य कुलश्रेष्ठ, निखिल मेहता, जेसन थाम, युनूस खान आणि कुंज आनंद यांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.