Sanam Teri Kasam Rerelease: अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांचा २०१६ साली रीलिज झालेला सिनेमा, २०२५ मध्ये रीरीलिजनंतर धुमाकुळ घालतो आहे.
हायलाइट्स:
- हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांचा सिनेमा
- ९ वर्षांनी झाला रीरीलिज
- बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ
‘सनम तेरी कसम’ ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पुन्हा रीलिज झाला आणि या दिवशी या सिनेमाने ५.१४ कोटींची कमाई केली. यानंतर दुसऱ्या दिवशी हर्षवर्धन-मावरा यांच्या या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली. पहिल्या शनिवारी या चित्रपटाने ६.२२ कोटींची कमाई केली. एकूण दोन दिवसातच सिनेमाची कमाई ११.३६ कोटी झाली आहे. ९ वर्षांपूर्वी जेव्हा हा चित्रपट रीलिज झाला होता, तेव्हा केलेल्या लाइफटाइम कमाईपेक्षा २०२५ या वर्षातील २ दिवसांचा गल्ला जास्त असल्याने, एक वेगळा रेकॉर्ड झाला आहे.
२०१६ मध्ये या चित्रपटाने अवघे ९.५० कोटी रुपये कमावले होते, त्यापेक्षा जास्त पैसे आता २ दिवसातच कमावता आले आहेत. या सिनेमाचा नायक हर्षवर्धनने यानंतर प्रेक्षकांचे आभार व्यक्त करणारी पोस्टही शेअर केली आहे. तसेच अभिनेत्री मावराचा या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये किंवा रीरीलिजच्या प्रक्रियेत कुठेही सहभाग नसला तरीही तिने इन्स्टाग्राम स्टोरीमधून आनंद व्यक्त केलाय की, तिचा सिनेमाला ९ वर्षांनी प्रेक्षकांचे प्रेम मिळते आहे.